Ranbir Kapoor and Alia Bhatt Dainik Gomantak
मनोरंजन

रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तारखेत बदल?

मला माझ्या मैत्रिणीकडून (नीतू कपूर) याबबात न बोलण्याच्या सूचना आहेत: महेश भट्ट

दैनिक गोमन्तक

सध्या बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची सर्वाधिक चर्चा आहे. विशेषत: लग्नाच्या तारखेवरून अनेक अंदाज बांधले जात आहेत. या विषयावर रणबीरचे संपूर्ण कुटुंब मौन बाळगून आहे.

लग्नाच्या तारखेवर शिक्कामोर्तब करत आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी पत्रकारांना सांगितले की, 13 एप्रिलला मेहंदीच्या कार्यक्रम असून 14 एप्रिलला लग्न निश्चित करण्यात आले आहे. मात्र, आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट्ट रणबीर आणि आलियाच्या लग्नाची वेगळी तारीख सांगत आहे. राहुलच्या म्हणण्यानुसार, लग्नाची तारीख 14 ठरवण्यात आली होती. मात्र मीडियामध्ये तारीख लीक झाल्यामुळे ती बदलण्यात आली आहे.

राहुल म्हणाला, लग्न होत आहे, हे सर्वांना माहीत आहे. मात्र 13 आणि 14 एप्रिलला लग्न नाही. ही खात्रीशीर माहिती आहे. मी स्वतः माझ्या तोंडून सांगतो की 13 आणि 14 तारखेला लग्न नाही. माझ्या माहितीनुसार, मीडियामध्ये (Media) लवकरच तारखेबाबत घोषणा केली जाईल.

महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी लग्नाच्या तारखेबाबत मौन पाळताना सांगितले की, मला माझ्या मैत्रिणीकडून (नीतू कपूर) याबबात न बोलण्याच्या सूचना आहेत.

रणबीर आणि आलियाच्या लग्नावर नीतू कपूरचं काय म्हणणं आहे?
नीतू कपूर म्हणाली, मी दोन वर्षांपासून लग्नाच्या तारखेच्या बातम्या ऐकत आहे. माध्यमांतून रोज नवी तारीख उघड होत असते. जे काही घडेल त्याची लोकांना माहिती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT