अमित शहांच्या हिंदी वक्तव्यावर ए. आर रहमान यांचा 'सूचक' टोला

लोक स्वतःच्या इच्छेने हिंदी शिकू शकतात परंतु हिंदी लादणे अस्वीकार्य असल्याचे तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष AIADMK ने म्हटले आहे.
A. R Rehman
A. R RehmanDainik Gomantak
Published on
Updated on

लोक स्वतःच्या इच्छेने हिंदी शिकू शकतात परंतु हिंदी लादणे अस्वीकार्य असल्याचे तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष AIADMK ने म्हटले आहे. दरम्यान, ऑस्कर पुरस्कार विजेते ए.आर. रहमान (A. R Rehman) यांनी तमिळ भाषेबाबत पोस्ट केलेल्या एका फोटोवरुन सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे. दिवंगत द्रविड नेते सी.एन. अण्णादुराई (C.N. Annadurai) यांचा हवाला देत अण्णाद्रमुकचे सर्वोच्च नेते ओ. पन्नीरसेल्वम म्हणाले की, ''ज्यांना हिंदी शिकायचे आहे, ते गरज पडल्यास स्वतःच्या इच्छेने शिकतील, परंतु लोकांवर हिंदी लादणे कधीही मान्य केले जाणार नाही.'' (A. R Rehman's tweet sparked a discussion during Home Minister Amit Shah's statement on Hindi)

दरम्यान, माजी मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, 'तामिळ आणि इंग्रजी या दोन भाषांचे धोरण अण्णादुराई यांच्या विचारसरणीशी सुसंगत आहे.' दरम्यान, ट्विटरवरील अनेक युजर्सनी रहमानच्या पोस्टचा संबंध अमित शाह (Amit Shah) यांच्या हिंदीवरील विधानाशी आणि त्यावरुन आलेल्या प्रतिक्रियांशी जोडला आहे.

A. R Rehman
Birthday Special: कपिल शर्माच्या वाढदिवसानिमित्त पत्नीने केले भव्य सेलिब्रेशन

तसेच, स्थानिक भाषांऐवजी इंग्रजीचा पर्याय म्हणून हिंदीचा वापर करावा, असे अमित शाह यांनी 7 एप्रिल रोजी सांगितले होते. यावर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले होते की, 'यामुळे देशाच्या अखंडतेला धोका आहे.' रहमान यांनी एक फोटो पोस्ट केला ज्यावर त्यांनी 'तमिशानगु' लिहिले आहे. जे तामिळ भाषेला समर्पित करणारे गाणे आहे. फोटोच्या खाली असलेली ओळ तमिळ राष्ट्रवादी कवी भारतीदासन यांच्या कवितेतील आहे. तामिळ भाषा हे तमिळ लोकांच्या हक्कांचे मूळ आहे. रहमान यांनी पोस्ट केलेल्या फोटोत लाल बॅग्राऊंडवर पांढरी साडी घातलेली एक महिला दिसतेयं जी तमिळ भाषिक लोकांच्या भावना आणि हिंदी लादण्याचा संदर्भ असल्याचे सूचित होत आहे.

A. R Rehman
Birthday Special: हेलन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या खाजगी आयुष्यातील खास गोष्टी

याशिवाय, रहमान यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एका गटाने रहमान यांचे कौतुक सुरु केले. त्यांनी लाल बॅग्राऊंडवर असलेल्या फोटोवर पोस्ट करुन हिंदी आणि तमिळ भाषेला पूर्ण पाठिंबा दिला आहे, तर इतरांनी फोटो पोस्ट करण्याच्या त्यांच्या हेतूवर शंका घेतली आहे. ट्विटरवर एका युजरने म्हटले आहे की, 'संगीत दिग्दर्शकाने हिंदी चित्रपटांमध्ये काम करुन पैसा आणि लोकप्रियता मिळवली आणि आता ते हिंदीला टार्गेट करत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com