Ranbir Kapoor and Alia Bhatt  Dainik Gomantak
मनोरंजन

Alia-Ranbir: एकीकडे लग्नाची तयारी, तर दुसरीकडे चित्रपटाचे शूटिंग सुरू

दोघांचे कुटुंबीय लग्नाची सर्व औपचारिकता पूर्ण करत आहेत.

दैनिक गोमन्तक

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र आलिया पनवेलमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्थ आहे. ती सध्या 'रॉकी' आणि 'रानी की प्रेम कहानी' या चित्रपटांसाठी पनवेलमध्ये शूटिंग करत आहे. केवळ आलियाच नाही तर रणबीर कपूरही त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. रणबीर मुंबईच्या आरे कॉलनीमध्ये श्रद्धा कपूरसोबत चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या शीर्षकहीन चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक लव रंजन करत आहेत.

लग्नाची तयारी कोण पाहत आहे?
आलिया आणि रणबीर दोघेही त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. दोघांचे कुटुंबीय लग्नाची सर्व औपचारिकता पूर्ण करत आहेत.

रणबीर कपूर कुठे आहे?
आलिया रविवारी दुपारी पनवेलला रवाना झाली आहे. दुसरीकडे, रणबीर कपूर (Ranbir Kapoor) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटाच्या (Movie) ठिकाणाजवळ पश्चिम गोरगावमध्ये राहत आहे. दोघांनी नुकतेच ब्रह्मास्त्र चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे.

रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तारखेत बदल?
लग्नाच्या तारखेवर शिक्कामोर्तब करत आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी पत्रकारांना सांगितले की, 13 एप्रिलला मेहंदीच्या कार्यक्रम असून 14 एप्रिलला लग्न निश्चित करण्यात आले आहे. मात्र, आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट्ट रणबीर आणि आलियाच्या लग्नाची वेगळी तारीख सांगत आहे. राहुलच्या म्हणण्यानुसार, लग्नाची तारीख 14 ठरवण्यात आली होती. मात्र मीडियामध्ये (Media) तारीख लीक झाल्यामुळे ती बदलण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT