आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या (Alia-Ranbir Wedding) लग्नाच्या बातमीने संपूर्ण सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. दररोज त्यांच्या लग्नाशी संबंधित बातम्या समोर येत आहेत. मात्र, ही गोष्ट पूर्णपणे खरी असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही अधिकृत वक्तव्य आतापर्यंत त्यांच्या घरून किंवा रणबीर-आलियाकडून आलेले नाही. मात्र, आलियाचे काका मुकेश भट्ट आणि भाऊ राहुल भट्ट यांनी लग्नाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले असून, लग्नाशी संबंधित सर्व बातम्या सांगणार असल्याचे सांगितले आहे. पण आता रणबीरचे घर पूर्णपणे सजवले जात असल्याची बातमी समोर येत आहे, ज्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. (Alia-Ranbir Wedding)
असे असले तरी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या लग्नाच्या तारखांची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. त्याच्या पालकांनी 14 एप्रिलला होणाऱ्या समारंभाची कोणतीही माहिती दिली नाही. असे असताना रणबीरच्या मुंबईतील घरात सजावट होत असल्याचा सुगावा लागला. रविवारी, छायाचित्रकारांनी काही कामगारांना रणबीरच्या घरी सजावटीच्या स्ट्रिंग लाइट्सचा गुच्छ लावताना पाहिले. घराचा बाहेरील भाग अजूनही झाकलेला आहे, परंतु त्याभोवती दिवे देखील लावले जात आहेत.
मात्र, लग्नाबाबत निर्माण झालेल्या सस्पेन्समुळे इतरांची निराशा झाली आहे. अलीकडेच, रणबीरची आई नीतू कपूरने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती लग्नाच्या अफवांना टाळण्याचा किंवा खंडन करण्याचा प्रयत्न करत होती. रणबीर कपूरचे काका रणधीर कपूर यांनाही आलिया-रणबीरच्या लग्नाची कोणतीही माहिती नाही. नुकतेच एका आघाडीच्या वेबसाईटशी संवाद साधताना त्यांनी सांगितले होते की, एवढा मोठा विवाह आमच्या घरात होत असेल तर मला कोणीतरी फोन करून सांगितले असते, असे उत्तर देण्यात आले. खरे तर रणधीर कपूर सध्या मुंबईत नाही.
Video Credit- viralbhayani
फार कमी लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे
एका सूत्राने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, विवाह सोहळा रणबीरच्या नवीन घरात होणार आहे. बहुधा, तो सातव्या मजल्यावर असेल. या विवाह सोहळ्यासाठी केवळ 45-50 लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे ज्यामध्ये काही जवळचे नातेवाईक, कुटुंबातील सदस्य आणि चित्रपट निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांसारखे जवळचे मित्र येणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.