रामनवमीच्या मुहूर्तावर साऊथ सुपरस्टार प्रभास दिसला श्री रामाच्या अवतारात!

चित्रपट निर्माते ओम राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काय आहे?
South superstar Prabhas
South superstar Prabhas Twitter
Published on
Updated on

साऊथ सुपरस्टार प्रभासच्या (South Superstar Prabhas) 'आदिपुरुष' (Adipurush) या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये सुपरस्टार प्रभास 'श्री राम'च्या (shree Ram) अवतारात दिसत आहे. हा व्हिडिओ चित्रपट निर्माते ओम राऊत यांनी शेअर केला आहे. खरंतर प्रभासच्या या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत प्रभासच्या चाहत्यांनी त्यांचे श्री राम म्हणून फोटोशॉप केले आणि सोशल मीडियावर अपलोड केले. जेव्हा चित्रपट निर्मात्याने हे फोटो पाहिले तेव्हा त्यांनी त्या फोटोंचा व्हिडिओ बनवला आणि 'राम नवमी'च्या (Ramnavmi) खास प्रसंगी शेअर केला.

South superstar Prabhas
Weekend Selfie: प्रियंका चोप्राची खास चाहत्यांसाठी पोस्ट

चित्रपट निर्माते ओम राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काय आहे?

हा व्हिडीओ शेअर करताना ओम राऊत यांनी कॅप्शनमध्ये लिहिले -

उफनता वीरता का सागर,

छलकती वात्सल्य की गागर।

जन्म हुआ प्रभु श्रीराम का,

झूमें नाचे हर जन घर नगर। या काही काव्यपंक्ती लिहिल्या. त्याच बरोबर चाहत्यांना राम नवमीच्या शुभेच्छाही दिल्या. व्हिडिओमध्ये प्रभास वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला ओम राऊतने चाहत्यांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच 'आदिपुरुष' चित्रपटाचे पोस्टर चाहत्यांनी लावल्याचे व्हिडिओमध्ये लिहिले आहे.

South superstar Prabhas
रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या तारखेत बदल?

या चित्रपटाबाबत अशी अटकळ बांधली जात आहे की, सुपरस्टार प्रभास 'आदि पुरुष' चित्रपटात भगवान रामची भूमिका साकारू शकतो. अशा परिस्थितीत चाहते त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. रामनवमीच्या मुहूर्तावर या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज होऊ शकते, अशी बातमी होती. मात्र असे झाले नाही. अशा परिस्थितीत चित्रपट निर्माते ओम राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. मात्र, नंतर निर्मात्यांनी हा चित्रपट कधी प्रदर्शित करायचा यावर अधिक विचार केला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com