Akshay Kumars film Bellbottom leaked online Twitter/@_bollywoodtown
मनोरंजन

अक्षय कुमारचा 'बेलबॉटम' चित्रपट झाला ऑनलाइन लीक

महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) सिनेमा हॉल उघडण्याची परवानगी अद्याप दिलेली नाही.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बेलबॉटम (Bellbottom) हा चित्रपट काल जगभरात प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) सिनेमा हॉल उघडण्याची परवानगी अद्याप दिलेली नाही. यानंतरही अक्षय कुमारने आपला चित्रपट प्रदर्शित केला आहे. पण रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासातच हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे (Bellbottom Leaked Online).

हा चित्रपट आता HD मध्ये एका वेबसाइटवर लीक झाला आहे. जगभरात प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण चित्रपटाच्या लीकची बातमी समोर आल्यानंतर चित्रपटाच्या व्यवसायावर मोठा परिणाम होऊ शकतो. समीक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला आहे. जिथे प्रेक्षकांनी सांगितले आहे की ते या चित्रपटाचा सिक्वेल पाहण्याच्या मूडमध्ये आहेत.

त्याचबरोबर बॉलिवूडच्या सर्व कलाकरांना हा चित्रपट खूप आवडला आहे. कंगना राणावत, अजय देवगण आणि रितेश देशमुख यांनी अक्षय कुमारच्या बेलबॉटम चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. माध्यमांशी बोलताना अभिनेत्याने या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दलही बोलले आहे. अक्षय कुमार म्हणतो की "होय, या चित्रपटाचा सिक्वेल बनवला जाऊ शकतो, या कारणास्तव हा चित्रपट ओपन एंडिंगसह संपला आहे, जर चित्रपटाच्या टीमने मला एक मजबूत स्क्रिप्ट दिली तर मी नक्कीच त्यांना या चित्रपटासाठी विचारेल ."मला सिक्वेलवर काम करायला आवडेल, पण आत्ता याबद्दल काहीच सांगता येणार नाही.

अक्षय कुमारने गेल्या वर्षी लंडनमध्ये लॉकडाऊन दरम्यान या चित्रपटाचे शूटिंग केले होते. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त लारा दत्ता, वाणी कपूर आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिकेत दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे अक्षयला हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करायचा नव्हता, प्रेक्षकांनी त्याचा चित्रपट सिनेमागृहांमध्ये पाहावा अशी त्याची इच्छा होती. ज्यामुळे अभिनेत्याने हा चित्रपट रिलीज केला आहे. मुंबईतील सिनेमागृहे बंद झाल्यामुळे अभिनेत्याने आपल्या चित्रपटाचे दिल्ली आणि सुरत येथे प्रिमियरही केले. अभिनेता सतत या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतलेला आहे. ऑनलाइन रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचा व्यवसायावर किती परिणाम होतो हे पाहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT