Akshay Kumar Dainik Gomantak
मनोरंजन

'इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आक्रमणकर्त्यांबद्दल खूप काही पण...': अक्षय कुमार

इतिहासाच्या पुस्तकांमध्ये भारतीय राजांचा उल्लेख कमी आहे, तर या पुस्तकांमध्ये आक्रमकणकर्त्यांचा मोठा वाटा आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारित त्याच्या आगामी चित्रपटाबाबत बोलताना दावा केला की, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये भारतीय राजांचा उल्लेख कमी आहे, तर या पुस्तकांमध्ये आक्रमकणकर्त्यांचा मोठा वाटा आहे. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांचा 'पृथ्वीराज' चित्रपट या शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (akshay kumar says lot about invaders in history books)

अक्षय कुमारने (Akshay Kumar) एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ''दुर्दैवाने आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबद्दल फक्त दोन-तीन ओळी आहेत, परंतु आक्रमणकर्त्यांबद्दल बरेच काही नमूद केले आहे.'' अक्षयने शिक्षणमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले. इतिहासाच्या (History) पुस्तकात आपली संस्कृती आणि महाराजांबद्दल फारसे काही नाही.

आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये याबद्दल कोणीही लिहिणार नाही, असे अक्षय म्हणाला. मला शिक्षणमंत्र्यांना आवाहन करायचे आहे की त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि आपण समतोल साधू शकतो का ते पहावे. आपल्याला मुघलांबद्दल माहिती असायला हवी, पण आपल्या राजांचीही माहिती असायला हवी, तेही खूप चांगले होते, असेही तो म्हणाला.

शिवाय, गायक कृष्णकुमार कुननाथ (KK) यांच्या निधनाबद्दल अक्षय कुमार म्हणाला की, तो माझ्या करिअरचा एक भाग होता, तो माझ्या चित्रपटांचा एक भाग होता. एअरलिफ्टसाठी त्याने जबरदस्त गाणे गायले. काल रात्री जे घडले ते अतिशय दुःखद आणि धक्कादायक होते. मानसिक आरोग्याबाबत अक्षय म्हणाला की, आपण स्वतःला शांत ठेवले पाहिजे. आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणण्याची गरज आहे. कोविडमधून (Covid) बाहेर येईपर्यंत काही वर्षे गर्दी थोडी कमी केली पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT