Akshay Kumar Upcoming Movie Dainik Gomantak
मनोरंजन

खिलाडी कुमार पुन्हा ॲक्शन करणार... रोहित शेट्टी निर्मित आगामी चित्रपटात अक्षय कुमार

Rahul sadolikar

Akshay Kumar in upcoming Movie : बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती जरी रोहित शेट्टी करणार असला तरी याचं दिग्दर्शन मात्र तो करणार नाही. चला पाहुया यासंदर्भातले सविस्तर वृत्त.

मिशन राणीगंज

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल झाला आहे. त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकू शकला नाही. 

आता अक्षयबद्दल बातम्या येत आहेत की तो मोहित सुरी आणि रोहित शेट्टीच्या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात काम करत आहे. 

मोहित सुरीच्या इंस्टाग्राम पोस्टवरून याची पुष्टी झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये थिएटरमध्ये येऊ शकतो.

अक्षय कुमार दिसणार अनोख्या भूमीकेत

यासोबतच या चित्रपटाच्या नावाचीही माहिती समोर येत आहे. या चित्रपटाचे नाव 'सायको' असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात अक्षय कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

अमर उजालाच्या वृत्तानुसार, हा एक थ्रिलर चित्रपट आहे जो दिग्दर्शक मोहित सुरी बनवत आहे आणि त्यामध्ये अक्षय कुमार एक अशी भूमिका साकारणार आहे जी याआधी कधीही पाहिली नसेल. या चित्रपटात खिलाडी कुमार सायकोच्या भूमिकेत दिसणार आहे.   

चित्रपटाचं लवकरच काम सुरु

हा चित्रपट पुढच्या वर्षी 2024 मध्ये फ्लोरवर जाईल. अक्षय कुमारच्या सर्व चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट देखील मॅरेथॉन शेड्यूलमध्ये शूट केला जाणार आहे. 

या चित्रपटावर लवकरच काम सुरू होणार आहे. असे सांगितले जात आहे की ही एक स्क्रिप्ट आहे जी रोहित शेट्टीला आवडते आणि त्याच्या बॅनरचा हा पहिला चित्रपट असावा जो त्याने दिग्दर्शित केलेला नाही. हा चित्रपट फ्लोरवर घेण्यासाठी रोहित खूप उत्सुक आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: 35 अनधिकृत बांधकामांवर पुन्हा चालला बुलडोझर; करासवाडा जंक्शन येथे पालिकेची कारवाई

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गावर कुटुंबियांसह रात्रीचा प्रवास सुरक्षित आहे का? काय सांगतात प्रवासी

Goa Today's News Live: जीप संघटना दूधसागर पर्यटन हंगामाच्या विरोधात ठाम!

Ranji Cricket Tournament: अर्जुन तेंडुलकरसह हेरंब, शुभमचा भेदक मारा, सुयश आणि रोहणचं 'तूफान'; सिक्कीमचा संघ पत्त्यासारखा कोसळला !

गोव्याच्या भूमीत विकसित झालेली 'श्वेतकपिला' गाय; सरकारने राजाश्रय देण्याची गरज

SCROLL FOR NEXT