Akshay Kumar Tiger Shroff Dainik Gomantak
मनोरंजन

Akshay Kumar Accident: बॉलिवूडचा खिलाडी जखमी...शूटींग करताना अक्षय कुमारचा स्कॉटलंडमध्ये अपघात...

अभिनेता अक्षय कुमारचा शूटींगदरम्यान स्कॉटलंडमध्ये अपघात झाला आहे

Rahul sadolikar

Akshay Kumar Got into Accident During Shooting: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक काळजी वाटायला लावणारी बातमी आहे. अभिनेता अक्षय कुमारचा एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अपघात झाला आहे.

हल्ली चित्रपटात काम करणे म्हणजे फक्त अभिनय करणे नाही त्यासाठी अनेक धोके पत्करावे लागतात. बऱ्याचदा जीवाची बाजी लावून स्टंट करावे लागतात. यासाठी चित्रपटात अनेकदा बॉडी ड्बलचा वापर करतात. म्हणजे अभिनेत्याच्या ऐवजी दुसराच कलाकार हे स्टंट करत असतो.

अक्षय कुमार हा असा अभिनेता आहे जो स्वतःचे स्टंट स्वतःच करतो. यापुर्वीही अक्षयने अनेक चित्रपटांमधुम धोकादायक स्टंट केले आहेत म्हणूनच त्याला खिलाडी असेही म्हंटले जाते.

मात्र, स्कॉटलंडमध्ये त्याच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टंट करताना त्याला दुखापत झाली आहे.

टायगर श्रॉफसोबत ऍक्शन सीनचं शूटिंग करत असताना अक्षय कुमारचा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अक्षय कुमार जरी जखमी झाला असला, तरी त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरुच राहणार आहे. अक्षयही सेटवर पूर्णवेळ असणार आहे फक्त स्पेशल ऍक्शन सीक्वेन्सचं शूटिंग सध्या थांबवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, 'अक्षय कुमार टायगर श्रॉफसोबत एका ऍक्शन सीनचे चित्रीकरण करत होता.

दरम्यान एक विशेष स्टंट करताना त्याला दुखापत झाली आहे. सध्या त्याच्या गुडघ्यावर ब्रेसेस आहेत. स्कॉटलंडमधील शूटिंग वेळेवर पूर्ण व्हावं म्हणून अक्षय सध्या क्लोज-अप्ससह शूट करत आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये अक्षय आणि टायगरशिवाय सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट 1998 मध्ये आला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, गोविंदा प्रमुख भूमिकेत होते. तर त्याच्या आगामी सिक्वळ मध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची जोडी दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT