Drishyam 2 Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

1st Day Collection of Drishyam 2: 'दृश्यम 2' ने पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

बॉलीवुडच्या 'सिंघम'ची बॉक्सऑफिसवर डरकाळी; अक्षयकुमारच्या 'रामसेतु'ला पछाडले

Akshay Nirmale

1st Day Collection of Drishyam 2: बॉलीवुडचा 'सिंघम' अजय देवगन याच्या बॉक्स ऑफिसवर मोठी डरकाळी 'दृश्यम 2'ने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशीच्या कमाईत या वर्षीचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'दृश्यम 2'ने अक्षयकुमारच्या 'रामसेतु'ला मागे टाकले आहे.

'दृश्यम 2' ने पहिल्या दिवशी 15.38 कोटी रूपयांचा गल्ला कमावला आहे. 'दृश्यम 2' भारतात जवळपास 3300 स्क्रीन्सवर रीलीज झाला आहे. अजय देवगनच्या गेल्या दोन वर्षात आलेल्या सर्व चित्रपटांत 'दृश्यम 2' ने सर्वाधिक ओपनिंग दिली आहे. यावर्षी आलिया भट्ट, रणबीर कपुरच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाने पहिल्या दिवशी सर्वाधिक 37 कोटी कमाई केली होती. अक्षयकुमारचा 'रामसेतु' पहिल्या दिवशी 15.25 कोटी कमाईसह दुसऱ्या स्थानी होता. पण आता दृश्यम २ ने 'रामसेतु'ला पछाडले आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. आदर्श यांनी म्हटले आहे की, एका खराब काळानंतर फिल्म इंडस्ट्री पुन्हा उभी राहिली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली सुरवात केली आहे. हा चित्रपट यावर्षीचा पहिल्या दिवशीच्या कमाईमध्ये दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. वीकेंडअखेर हा चित्रपट 50 कोटी रूपयांचा आकडा पार करेल, अशी आशा आहे.

मल्याळम चित्रपटाचा रीमेक

दृश्यम 2 हा मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या याच नावाच्या मल्याळम चित्रपटाचा रीमेक आहे. यापुर्वीचा अजय देवगणचा दृश्यम देखील मूळ मोहनलाल यांच्याच मल्याळम चित्रपटाचा रीमेक होता. नंतर इतरही भाषांमध्ये त्याचे रिमेक झाले. अजयच्या पहिल्या दृश्यमचे दिग्दर्शन निशिकांत कामतने केले होते. त्यांच्या निधनानतंर आता दृश्यम २ चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Bust: थिवी रेल्वे स्थानकावर 3.5 लाखांचा अंमली पदार्थ जप्त, 25 वर्षीय नेपाळी नागरिकाला अटक; कोलवाळ पोलिसांची कारवाई

...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

Goa Live Updates: मुंगुल हल्ल्याप्रकरणी एका आरोपीला सशर्त जामीन मंजूर!

Goa Tourism: 'गोव्याची बदनामी थांबवूया'! रस्ते, भटकी जनावरे, भिकारी प्रश्नांवर चर्चा; नागवा-हडफडेत पर्यटन हंगामाबाबत बैठक

SCROLL FOR NEXT