Bhola Advance Booking Dainik Gomantak
मनोरंजन

Bhola Advance Booking : अजय देवगनच्या 'भोला'ची रिलीज आधीच छप्परफाड कमाई...

अभिनेता अजय देवगनच्या आगामी भोला या चित्रपटाने रिलीजआधीच प्रचंड कमाई केली आहे.

Rahul sadolikar

अजय देवगनच्या भोला या चित्रपटाने अॅडव्हान्स बूकींगला जोरदार सुरूवात केली आहे, त्यामुळे साहजिकच रिलीजच्या आधीच चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. भोला यावर्षीच्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे.

दृष्यम 2 च्या शानदार यशानंतर, आता अजय देवगण पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रेक्षकांमध्ये परतण्यासाठी सज्ज झाला आहे. रामनवमीला उद्याच 30 मार्चला त्याचा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

पठाण आणि तू झुठी, मैं मक्कार नंतरचा हा या वर्षातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अजय देवगण आणि तब्बू स्टारर चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग काही दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे. 

अजय देवगणच्या या अ‍ॅक्शन चित्रपटाची तिकिटे जोमाने विकली जात आहेत. चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे.

या चित्रपटात अभिनय करण्यासोबतच अजय देवगन या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. भोलाचे आगाऊ बुकिंग रविवारी सुरू झाले आणि आता अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात अवघ्या तीन दिवसांत 14000 हजाराहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.

मात्र, बुधवारसाठी आगाऊ बुकिंग होणे बाकी आहे. या बूकींगमधुन या चित्रपटाने रिलीजपूर्वीच जवळपास 3.65 कोटींचा व्यवसाय केला आहे. 'भोला' रिलीज होताच अजय देवगणने स्वतःच्या 'दृश्यम-2' या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचा विक्रम मोडला आहे. त्याचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट 'दृश्यम-2' ने आगाऊ बुकिंगमध्ये सुमारे 2.80 कोटींचा व्यवसाय केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT