Bhola  Dainik Gomantak
मनोरंजन

Bhola च्या प्रमोशनसाठी सिंघमने लढवली अनोखी शक्कल! हा व्हिडीओ बघाच

दैनिक गोमन्तक

Bhola: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण त्याच्या नवीन चित्रपट भोलामुळे चर्चेत आहे. यामध्ये अजय जबरदस्त अॅक्शन आणि स्टंट करताना दिसणार आहे, त्याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. 

दरम्यान, अजय देवगणने 'भोला यात्रा' सुरू केली आहे, त्याअंतर्गत आज त्याने मुंबईतून 'भोला ट्रक'ला हिरवा झेंडा दाखवला, ज्यात चित्रपटाचे पोस्टर्स आहेत.

रिलीजपूर्वी निर्मात्यांनी भोला यात्रा सुरू केली आहे. 'भोला'चे ट्रक ठाणे, सुरत, अहमदाबाद, उदयपूर, जयपूर, गुरुग्राम, दिल्ली, कानपूर आणि लखनऊ या शहरांमध्ये पाठवले जात आहेत.

प्रत्येक शहरातील प्रमुख ठिकाणी हे ट्रक उभे केले जातील आणि शहरातील लोकांसाठी आनंददायी संध्याकाळचे आयोजन केले जाईल.

अजय देवगणचा 'भोला' हा साऊथचा हिट चित्रपट (Movie) कैथीचा हिंदी रिमेक आहे. यामध्ये अजय देवगण व्यतिरिक्त तब्बू, गजराज राव, दीपक डोबरियाल हे कलाकार दिसणार आहेत. विशेष म्हणजे यात अजय देवगण मुख्य भूमिकेत असून त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

आगामी चित्रपट कोणते

अजय देवगण शेवटचा 'दृश्यम 2' या चित्रपटात दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 'भोला' नंतर अजय देवगण रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये दीपिका पदुकोन देखील असणार आहे. अजय देवगण पुन्हा एकदा सिंघम अगेनमध्ये अॅक्शन अवतारात दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT