बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी कधी सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे हे कलाकार सातत्याने चर्चांचा भाग बनतात.
आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण चर्चांचा भाग बनला आहे. आप की अदालत या शोमध्ये तो एकदा सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने जेव्हा बॉलीवूडमध्ये डेब्यू केले त्यावेळी त्याच्यावर कशाप्रकारे टीका झाली याबद्दल वक्तव्य केले होते. माझ्या चेहऱ्यावर अनेकांनी टीका केली होती, हा नायक कसा होऊ शकतो? हा कसा दिसतो असे अनेकांनी म्हटले होते.
मात्र अजय देवगणने आपल्या अभिनयाच्या जोरावर फक्त प्रेक्षकांचीच नाही तर मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांचीदेखील हृदये जिंकली. लोकप्रिय अभिनेते नसरुद्धीन शहा यांनीदेखील याबद्दल वक्तव्य केले होते. मी या मुलाला ओळखण्यात चुकलो, याला मदत करायला हवी होती, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्याचे म्हटले जाते.
अजय देवगणने 1991 मध्ये 'फूल और कांटे' नावाचा पहिला चित्रपट केला होता, ज्यामध्ये तो मधुसोबत दिसला होता आणि हा त्या दोघांचा डेब्यू चित्रपट होता. आणि हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. 3 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 12 कोटींची कमाई केली.
महत्वाचे म्हणजे, अनिल कपूर आणि श्रीदेवींची मुख्य भूमिका असलेला 'लम्हें'देखील 'फूल और काटें' ज्यावेळी रिलिज होणार होता त्याचवेळी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. त्यामुळे अनिल कपूर यांनी तुम्ही चूक करत आहात, हे 'फूल और काटे' इतक्या मोठ्या मुहूर्तावर रिलीज करत आहात. पण झाले उलटेच 'लम्हें' हा चित्रपट फ्लॉफ झाला आणि 'फूल और काटे' हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर अजय देवगण यांनी मागे वळून पाहिले नाही.
भोला, मैदान, सिंघम, सिंघम अगेन, दृश्यम, दृश्यम २, दिलवाले, मैदान, आरआरआर, तानाजी, जान अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या आर. माधवनसोबत 'शैतान' या चित्रपटातून अजय देवगण प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महत्वाचे म्हणजे, हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून बॉक्स ऑफीसवर मोठा गल्ला जमवताना दिसत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.