Ajay Devgan: बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी त्यांच्या चित्रपटांमुळेदेखील हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अजय देवगण त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे.
गेल्या वर्षी अजय देवगण थिएटरमधून जवळपास दिसलाच नाही . त्याचा 'भोला' हा एकच सिनेमा रिलीज झाला होता, ज्याला फार चांगले किंवा फार वाईट म्हटले गेले नाही. थोडक्यात अजय देवगणच्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. आता यंदा २०२४ मध्ये अजय देवगण नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 50 दिवसांत त्यांचे 1-2 नव्हे तर 5 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
अजय देवगणचा बहुप्रतिक्षित 'मैदान' हा चित्रपट आता प्रदर्शित होणार आहे. एप्रिल 2024 मध्ये ईदच्या वेळी तो चित्रपटगृहात दाखल होईल. या चित्रपटात अभिनेत्याने प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारली आहे, ज्यांना भारतीय फुटबॉलचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. सय्यद अब्दुल रहीम यांनी 1950 ते 1963 मध्ये शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून काम केले. या चित्रपटात प्रियमणी, गजराज राव आणि बंगाली अभिनेता रुद्रनील घोष यांच्याही भूमिका आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपटही ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफीसवर या दोन चित्रपटांमध्ये स्पर्धा होण्याची शक्यता आहे.' बडे मियाँ छोटे मियाँ' बद्दल बोलायचे झाले तर सोनाक्षी सिन्हा आणि पृथ्वीराज सुकुमारनही यात दिसणार आहेत.
'मैदान' या चित्रपटाशिवाय अजय देवगण शैतान, 'सिंघम अगेन, 'रेड 2' आणि 'औरों में कहाँ दम था' या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. आता अजय देवगणचा कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आणि कोणता चित्रपट बॉक्स ऑफीसवर कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.