Ajay Devgn Veeru Devgn Dainik Gomantak
मनोरंजन

Ajay Devagn : आणि मग वडिलांंनी अजय देवगनच्या मदतीसाठी 200 फायटर्स पाठवले...

अजय देवगनचे वडिल वीरू देवगन यांनी मुलगा अजयच्या मदतीसाठी 200 प्रोफेशनल फायटर्स पाठवले होते

Rahul sadolikar

अभिनेता अजय देवगनने आपल्या संपुर्ण करिअरमध्ये एकापेक्षा एक अॅक्शन सीन दिले आहेत. अत्यंत सुंदर पद्धतीने शुट केलेले हे सीन साहिजिकच अजय देवगनचे वडिल विरु देवगन यांच्या मदतीशिवाय शक्यच नव्हते.

'फुल और कांटे' या अॅक्शन, ड्रामा चित्रपटांत साहसी दृश्ये शुट करताना दिग्दर्शक म्हणुन अजय देवगनचे वडील वीरु देवगन यांनीच काम केलं होतं.

आपल्या मुलाच्या करिअरसाठी प्रत्येक वडिल संवेदनशील असतात त्याप्रमाणे वीरू देवगन यांनी अजय देवगनच्या करिअरसाठी आपले सगळे कौशल्य पणाला लावले होते. फुल और कांटे या चित्रपटाच्या यशात वीरु देवगन यांचाही तितकाच वाटा आहे.

अजय देवगनने एकदा एक किस्सा शेअर केला होता कि कसा त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मदतीसाठी 200 प्रशिक्षित फायटर्स पाठवले होते. अजय देवगनने 'यादों की बारात' या शोमध्ये आपल्या वडिलांचा हा किस्सा शेअर केला होता. अजय देवगन एकदा आपला मित्र साजिद खान याच्याबरोबर कारमधुन गेला होता.

कारमधुन जात असताना अचानक कारचा धक्का एका बाईकला लागला आणि त्यावरुन जोरदार वाद झाला त्या काळात अजय देवगन फेमस नव्हता त्याची एकही फिल्म आली नव्हती त्यामुळे लोकांनी अजय देवगनला ओळखले नाही.

या भांडणात जोरदार मारामारीही झाली. जेव्हा ही गोष्ट वीरु देवगन यांना समजली तेव्हा त्यांनी 200 प्रशिक्षित फायटर्स मुलगा अजयच्या मदतीसाठी पाठवले होते. या 200 फायटर्सना बघुन त्या लोकांची पळता भुई थोडी झाली असेल हे मात्र नक्की. आपल्या वडिलांची ही आठवण सांगताना अजय देवगन यांनी त्यांच्याबद्दल आदरही व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT