Cannes 2023| Aishwarya Rai Bachchan & Aaradhya  Dainik Gomantak
मनोरंजन

Cannes 2023: ऐश्वर्याची आराध्यासह कान्सवारी... जंगी स्वागताचा व्हायरल व्हिडिओ

यंदा ती तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत कान्सला रवाना झाली. ऐश्वर्या-आराध्याचा तेथे पोहोचल्यावर जंगी स्वागताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Puja Bonkile

Aishwarya Rai Bachchan & Aaradhya Latest News: कान्स चित्रपट महोत्सव 16 मे रोजी सुरु झाला आहे. या महोत्सवात अनेक भारतीय सेलिब्रिटीमध्ये ऐश्वर्या राय बच्चन ही देखील सहभागी झाली.

यंदा ती तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत कान्सला रवाना झाली. ऐश्वर्या-आराध्याचा तेथे पोहोचल्यावर जंगी स्वागताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मुंबई विमानतळावरून रात्री उशीरा ऐश्वर्या राय बच्चन आराध्या सोबत कान्ससाठी रवाना झाली. ऐश्वर्या ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसली तर आराध्या कॅज्युअल आऊटफिटमध्ये दिसली. या माय-लेकीचा कान्समध्ये पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत झाले.

यंदाही ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर दिसणार आहे. यावेळी तिचा आउटफिट कसा असेव, ती कोणती ॲक्सेसरीज परिधान करणार, याविषयी माहिती समोर आलेली नाही. पण, फॅन्सना याविषयीचा उत्सुकता लागली आहे.

ऐश्वर्या शिवाय सारा अली खान, ईशा गुप्ता, उर्वशी रौतेला, अनुष्का शर्मा मानुषी छिल्लर सहभागी असतील.

दरम्यान, कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 च्या रेड कार्पेटवर चालणारी ईशा गुप्ता ही पहिली भारतीय सेलिब्रिटी आहे. ती हाय स्लिट गाऊनमध्ये फिरताना सर्वांनी पाहिलं.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मधील ईशा गुप्ताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल फोटो पाहुन ईशाचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत.

ईशाचा शेअर केला व्हिडीओ

ईशा गुप्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती म्हणते आहे की कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये भारत सरकारच्या प्रतिनिधी मंडळाचा भाग बनून ती खूप आनंदी आहे. 

ईशा गुप्ता म्हणाली, 'मी भारत सरकार आणि FICCI चे आभार व्यक्त करू इच्छिते. चित्रपटसृष्टीत भारत आता जागतिक व्यासपीठावर आहे. चित्रपटसृष्टीसह संपूर्ण जगासमोर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

या अभिनेत्रीही दिसणार कान्समध्ये

ईशा गुप्ता व्यतिरिक्त, यावेळी कान्स 2023 मध्ये पदार्पण करणाऱ्या भारतीय सुंदरींमध्ये मृणाल ठाकूर, सारा अली खान, अनुष्का शर्मा आणि मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर दिसणार आहेत.

गायक कुमार सानूची मुलगी के शॅनन देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल 16 मे ते 27 मे पर्यंत चालणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT