Aishwarya gave this special gift to Abhishek during dating  Dainik Gomantak
मनोरंजन

ऐश्वर्याने डेटिंगदरम्यान अभिषेकला दिले होते 'हे' खास गिफ्ट

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या 'बॉब बिश्वास'(Bob Biswash) चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या 'बॉब बिश्वास'(Bob Biswash) चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. अभिनेत्याचा दमदार अभिनय पाहिल्यानंतर सगळ्यांनाच त्याची खात्री पटली आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही सोशल मीडियावर आपल्या मुलाच्या या चित्रपटातील चमकदार अभिनयाचे कौतुक केले. या चित्रपटात अभिषेकने किलरची भूमिका केली आहे. गेल्या काही वर्षांत अभिषेकने वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

अभिषेकने अलीकडेच 'द रणवीर शो' या शोमध्ये रणवीर अल्लाहबादियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याची पत्नी ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai Bachchan) त्याला असे सरप्राईज दिले होते, जे पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याच्या आवडत्या गाण्याबद्दल बोलताना अभिषेक बच्चन म्हणाला की, डिलेमा हे अमेरिकन रॅपर नेलीचे गाणे आहे. हे गाणे 2002 मध्ये रिलीज झाले होते. केली रोलँड या गाण्यात आहे.

डेटिंगच्या दिवसांमध्ये ऐश्वर्याने हे गिफ्ट दिले होते

अभिषेकने खुलासा केला की तो अमेरिकन गायक रॅपरचा खूप मोठा चाहता आहे आणि आजही हे त्याचे आवडते गाणे आहे. त्याने पुढे सांगितले की, ज्या काळात आम्ही एकमेकांना डेट करत होतो, त्यावेळी ऐश्वर्याने नेली कडून तिच्या माईकवर ऑटोग्राफ घेऊन माझ्यासाठी आणली होती. जी आजही माझ्या टेबलवर आहे. हे आश्चर्यकारक आहे.

अभिषेक पुढे म्हणाला की, त्याने नेलीसोबत गाणेही गायले आहे. मी हा ट्रॅक माझा मित्र राघव जो भारतीय कॅनेडियन गायक आहे त्याच्यासोबत केला आहे. राघवने माझ्याशी संपर्क साधला आणि सांगितले की अरे मी हे गाणे करतोय, तुला हे करावे लागेल. त्यात नेली देखील आहे, मी लगेच हो म्हंटले.

2018 च्या एका शो मध्ये अभिषेक म्हणाला, “मी माझ्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये पहिल्यांदाच ऐश्वर्यासोबत काम केले. आम्ही पहिल्यांदा 'ढाई अक्षर प्रेम'मध्ये एकत्र काम केले होते. तेव्हापासून आम्ही मित्र होतो. 'कुछ ना कहो' हा आणखी एक चित्रपट आम्ही एकत्र करत होतो, त्यानंतर आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली आणि हळूहळू आम्हाला ती मैत्रीपेक्षाही जास्त वाटू लागली. 'उमराव जान'च्या वेळी आम्ही एकमेकांसाठी सिरीयस होतो आणि नंतर ऐश्वर्याला प्रपोज केले आणि आता आम्हाला एक लाडकी मुलगी आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्न केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT