Alia Bhatt  Dainik Gomantak
मनोरंजन

Aila Bhatt: वेध राष्ट्रीय पुरस्काराचे! सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार स्विकारण्यासाठी गंगुबाई तयार

Aila Bhatt: हा पुरस्कार सोहळा दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडणार आहे. इतर विजेत्यांसोबत आलियाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Aila Bhatt: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या सहज अभिनयाने मनोरंजन सृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने अगदी कमी कालावधीत एकापेक्षा एक हिट चित्रपट करत प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे.

आज आलियासाठी एक महत्वाचा आणि मोठा दिवस आहे. आलियाला आज तिला गंगुबाई काठियावाडी साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळणार आहे. हा तिचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार असणार आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचे नाव घोषित केले होते. आज हा पुरस्कार सोहळा दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडणार आहे. इतर विजेत्यांसोबत आलियाला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

या सोहळ्यासाठी आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत दिल्लीला जातानाचे विमानतळावरील फोटो व्हायरल झाले आहेत. संजय लिला भन्साळी दिग्दर्शित 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कारासाठी तिची निवड झाली आहे. याच श्रेणीत अभिनेत्री क्रिती सेनॉनची देखील निवड झाली असून तिला 'मिमि'मधील तिच्या भूमिकेसाठी तिची सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून निवड झाली आहे.

जेव्हा पुरस्कारा( Award )साठी नावांची घोषणा झाली होती. आलियाला गंगुबाईसाठी जेव्हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये बेस्ट अॅक्ट्रेससाठी निवड झाल्याचे समोर आली होते तेव्हा तिने सोशल मिडियावर भावनिक पोस्ट लिहिली होती.

आलियाने गंगुबाईच्या ऑयकॉनिक पोजमधील फोटो( Photo ) पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहले होते की, हा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाही, संजय सर, माझे कुटुंब, संपूर्ण टीम आणि माझा प्रेक्षकवर्ग तुम्हा सगळ्यांचा या पुरस्कारावर हक्क आहे. मला जोपर्यंत तुमचे मनोरंजन करणे शक्य आहे तोपर्यंत मी तुमचे मनोरंजन करेन.

गंगुबाई( जिला आलिया म्हणून देखील ओळखतात. ) अशा आशयाची आलियाने पोस्ट सोशल मिडियावर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने किर्तीसाठीदेखील मेसेज लिहला होता. ती म्हणते, किर्ती ज्या दिवशी मी मिमि पाहिला होता. त्या दिवशी मी तुला मेसेज केला होता. काय जबरदस्त भूमिका तू निभावली आहेस. तू हा पुरस्कार डिजर्व करतेस.आता आलिया आणि किर्तीचे चाहते त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, गंगुबाई काठियावाड हा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात आलियाने आपल्या सहज अभिनयाने भूमिकेला न्याय दिला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला होता. आता आलियाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्याने तिने साकारलेल्या भुमिकेला आणि घेतलेल्या मेहनतीला न्याय मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT