Oh My God 2 Dainik Gomantak
मनोरंजन

लैंगिक शिक्षण सक्तीचं... अक्षयचा ओ माय गॉड पाहिल्यानंतर महाराष्ट्रातल्या या शाळेने घेतला निर्णय

अभिनेता अक्षय कुमारच्या अलीकडेच रिलीज झालेल्या ओ माय गॉड चित्रपटाचा प्रभाव महाराष्ट्रातल्या एका शाळेवर पडला आहे.

Rahul sadolikar

चित्रपटाचा समाजावर चांगला प्रभाव पडायला हवा. समाजाचं प्रबोधन करण्याचं चित्रपट हे एक चांगलं माध्यम आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या 'ओ माय गॉड' या चित्रपटाने समाजाला शिक्षण देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

लैंगिक शिक्षणाच्या धाडसी विषयावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचा परिणाम केवळ प्रेक्षकांवरच नाही तर शिक्षणव्यवस्थेवरही होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील एका शाळेने हा चित्रपट पाहिल्यानंतर लैंगिक शिक्षण सक्तीचे केले आहे.

चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

अक्षय कुमारचा OMG 2 चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाची कमाई 114.31 कोटींवर गेली आहे. यासह पंकज त्रिपाठीने हे सिद्ध केले आहे की, अभिनयाची बाबतीत त्याला तोड नाही. 

या चित्रपटासमोर जर गदर 2 नसता तर ओएमजी 2 ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 200 कोटींचा गल्ला जमवला असता असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. लैंगिक शिक्षणाच्या धाडसी विषयावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचा परिणाम लोकांवरच नाही तर शिक्षणव्यवस्थेवरही होताना दिसत आहे. 

सेन्सॉर बोर्डाचे प्रतिबंध

सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात प्रदर्शित होण्यापूर्वी 27 कट केले होते आणि त्याला ए प्रमाणपत्र दिले होते. तर दुसरीकडे हा चित्रपट पाहून महाराष्ट्रातील उल्हास नगर येथील एका शाळेने लैंगिक शिक्षणाचा विषय आवश्यक केला आहे. 

महत्त्वाचे म्हणजे ही पहिली शाळा आहे जिने हा पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा OMG 2 हा चित्रपट याच शाळेत प्रदर्शित झाला होता. Oh my god 2 चे लेखक आणि दिग्दर्शक अमित राय यांनाही या खास प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते. ज्यांनी हा पुढाकार घेतला. 

या शाळेत प्रदर्शित केला होता चित्रपट

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा OMG 2 हा चित्रपट याच शाळेत प्रदर्शित झाला होता. Ohmygod 2 लेखक आणि दिग्दर्शक अमित राय यांनाही या खास प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते. ज्यांनी हा पुढाकार घेतला. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा OMG 2 हा चित्रपट याच शाळेत प्रदर्शित झाला होता. Ohmygod 2 लेखक आणि दिग्दर्शक अमित राय यांनाही या खास प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते.

सिलॅबसमध्ये लैंगिक शिक्षणाचा समावेश

चित्रपटाच्या या विशेष शो शाळेत आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सुमारे 184 शिक्षक सहभागी झाले होते. चित्रपट पाहिल्यानंतर, प्रौढ शिक्षणाचा मुद्दा पडद्यावर इतक्या सहजतेने मांडल्याबद्दल सर्वांनी अक्षय कुमारचे कौतुक केले. इतकंच नाही तर स्क्रीनिंगनंतर एज्युकेशन सोसायटीने लैंगिक शिक्षण हा विषय यंदा शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT