Vikrant Massey's 12 th fail movie  Dainik Gomantak
मनोरंजन

12 वी फेल... एका IPS अधिकाऱ्याची गोष्ट सांगणारा चित्रपट, विक्रांतने शेअर केली स्पेशल पोस्ट

अभिनेता विक्रांत मेसी त्याच्या 12 वी फेल चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.

Rahul sadolikar

Vikrant Massey's 12 th fail movie : विक्रांत मॅसी अभिनीत 12 वी फेल चित्रपट सध्या अनेकांना भुरळ घालत आहे. अभिनेता विक्रांत मॅसी त्याच्या वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटांसाठी ओळखला जातो. सध्या हा अभिनेता त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या '12वी फेल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला केवळ प्रेक्षकांचाच नाही तर सेलिब्रिटींचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 

आता चित्रपटाच्या यशानंतर, विक्रांत मॅसीने अलीकडेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि चित्रपटाचे वास्तविक जीवनातील नायक IPS मनोज कुमार शर्मा यांचे आभार मानले आहेत.

मनोज कुमार शर्मांची गोष्ट

'12वी फेल'च्या यशानंतर विक्रांत मॅसीला त्याच्या अभिनय कारकिर्दीत चांगला ब्रेक मिळाला आहे. अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर वास्तविक जीवनातील नायक मनोज कुमार शर्मा आयपीएस यांचे मनापासून आभार मानले आहेत. चला तर मग जाणून घेऊया अभिनेत्याने काय लिहिले आहे.

Vikrant Massey

इन्स्टाग्रामवर शेअर केली स्टोरी

विक्रांत मॅसीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, "सर, तुम्ही माझे हिरो आहात. तुम्ही माझे आयडॉल आहात. हे माझे भाग्य आहे की मला तुमच्यासारख्या साध्या आणि उमद्या व्यक्तीची व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली."

विक्रांत लिहितो

विक्रांतने पुढे लिहिले की, "फक्त माझ्यासाठीच नाही तर या देशातील लाखो लोकांसाठी आदर्श बनल्याबद्दल आणि मला खऱ्या आयुष्यात माझा #Restart क्षण दिल्याबद्दल मी नेहमीच तुमचा ऋणी राहीन. मी तुमच्यावर प्रेम करतो आणि नेहमीच करेन."

आज प्रत्येकजण तुमच्या कथेतून प्रेरणा मिळत आहे आणि मला वाटते की हा चित्रपट त्यांना एक नवीन धैर्य देईल आणि ते त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगले करू शकतील."

विधू विनोद चोप्राचा चित्रपट

निर्माता विधू विनोद चोप्रा यांचा 12 वा फेल चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. विक्रांत मॅसीशिवाय या चित्रपटात मेधा शंकर, संजय बिश्नोई आणि हरीश खन्ना यांच्याही भूमिका आहेत. 

या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विधू विनोदचा '12वी फेल' हा आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या वास्तविक जीवनातील कथेपासून प्रेरित आहे.

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT