Sara Ali Khan Shubhaman Gill  Dainik Gomantak
मनोरंजन

Sara Ali Khan Dates Shubhman: मुंबईनंतर आता दिल्लीतही सारा-शुभमनची डिनर डेट

दिल्ली-मुंबई विमान प्रवासही कपलने केला शेजारी-शेजारी बसून; रिलेशनशिपवर मात्र दोघांची चुप्पी

गोमन्तक डिजिटल टीम

Sara Ali Khan Dates Shubhman: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान अलीकडच्या काळात क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubhman Gill) सोबतच्या जवळीकीमुळे चर्चेत आहे. या दोघांना काही दिवसांपुर्वीच मुंबईतील एखा रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना स्पॉट केले गेले होते. त्यानंतर नुकतेच समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये हे कपल पुन्हा एकत्र दिसत आहे. सारा आणि शुभमन मुंबईनंतर आता दिल्लीतही डिनर डेटवर भेटले आहेत.

एव्हढेच नाही तर दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानात हे दोघे सोबतच होते. ही बाब समोर येताच बी टाऊनसह क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या चर्चेमध्ये दोघांच्या रिलेशनशिपवरच बोलले जात आहे.

जे व्हिडिओ सध्या समोर आले आहेत, त्यात गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील सारा ही चाहत्यांसोबत काही सेल्फी घेताना दिसत आहे. तर साराच्या शेजारील सीटवर शुभमन बसलेला दिसतो. त्यावर नेटकऱ्यांच्या खूप प्रतिक्रिया आल्या आहेत.

दोघांनीही या रिलेशनशिपबाबत खुलासा केलेला नाही. शुभमनपुर्वी सारा अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करत होती. तर शुभमनचे नाव यापुर्वी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरशी जोडले गेले होते.

साराच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर आगामी एका नाव न ठरलेल्या चित्रपटात ती अभिनेता विकी कौशलसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहे. याशिवाय विक्रांत मेसी सोबत ती 'गॅसलाईट' या चित्रपटात दिसणार आहे. तर करन जोहरची निर्मिती असलेल्या 'काँग्रेस रेडियो' या उषा मेहतांच्या बायोपिकमध्येही सारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शुभमन बाबत बोलायचे तर तो सध्या त्याची सुट्टी एंजॉय करत आहे.

दरम्यान, साराची आजी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी तत्कालीन भारतीय संघाचे कर्णधार मन्सुर अली खान पतौडी यांच्याशी विवाह केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT