govinda
govinda 
मनोरंजन

खिलाडी अक्षय कुमार नंतर आता 'हा' अभिनेता कोरोनाच्या जाळ्यात  

दैनिक गोमन्तक

देशात कोरोनाचा कहर पुन्हा चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची आकडेवारी अधिकच वेगाने वाढत असल्याचे दिसून येत असतानाच आता, चित्रपट सृष्टीत देखील कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केला आहे. बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमारला आज कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता अभिनेता गोविंदाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने चित्रपट सृष्टीत देखील आपला प्रभाव वाढवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (After Akshay Kumar actor Govinda is now infected by corona)

अभिनेता गोविंदाला (Govinda) कोरोनाची काही सौम्य लक्षणे आढळून आली होती. आणि त्यानंतर केलेल्या चाचणीत गोविंदाचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर गोविंदा सध्याच्या घडीला आपल्या घरीच क्वारंटाईन असल्याचे समजते. यापूर्वी आज सकाळीच अभिनेता अक्षय कुमारने (Akshay kumar) आपला अहवाल सकारात्मक आल्याची माहिती सोशल मीडियाच्या ट्विटरवरून दिली होती. याशिवाय, अक्षय कुमारने आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोविड टेस्ट करवून घेण्याचे आवाहन केले ट्विट मधून केले होते. त्यानंतर आता अभिनेता गोविंदाला देखील कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे चित्रपट सृष्टीत देखील कोरोनाने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. 

दरम्यान, यापूर्वी रणवीर कपूर, आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, आमिर खान आणि आर माधवन या सिनेतारकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. अभिनेता रणवीर कपूरची कोरोना चाचणी 9 मार्च रोजी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्याची आई नीतू कपूर यांनी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम वरून दिली होती. यानंतर आलिया भट्ट, कार्तिक आर्यन यांनी देखील सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम वरून आपला कोरोना अहवाल सकारात्मक आल्याचे म्हटले होते. तर आमिर खान आणि आर माधवन यांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात पकडले होते.       

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT