Shahrukh Khan in ae dil hai mushkil Dainik Gomantak
मनोरंजन

ए दिल है मुश्किलमध्ये शाहरुख ऐवजी हा अभिनेता करणार होता काम ;पण अचानक

ए दिल है मुश्किल या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानऐवजी दुसराच अभिनेता दिग्दर्शक करन जोहरची पसंती होता.

Rahul sadolikar

Shahrukh Khan in ae dil hai mushkil : ए दिल है मुश्किल या चित्रपटाचा दिग्दर्शक करन जोहरने आजवर अनेक लवस्टोरीज दिग्दर्शित केल्या. कुछ कुछ होता है सारख्या चित्रपटातून प्रेम आणि मैत्रीची परिभाषा शिकवणारा करन जोहरचा एक किस्सा समोर आला आहे.

ए दिल है मुश्किल या चित्रपटातून करन जोहरने एक नवी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती.

कॉफी विथ करनचा भाग

बॉलिवूड सिनेसृष्टीला दिग्दर्शक म्हणून अनेक चित्रपट देणारा करण जोहर अनेकदा चर्चेत राहतो. सध्या हा दिग्दर्शक त्याच्या प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या आठव्या सीझनच्या निमित्ताने मीडियामध्ये चर्चेत आहे. करणसाठी हे वर्ष खास होते, जिथे एकीकडे त्याने इंडस्ट्रीत 25 वर्षे पूर्ण केली,

ए दिल है मुश्किल

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाद्वारे त्याने सात वर्षांनी दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केले. या चित्रपटापूर्वी तो 'ऐ दिल है मुश्किल' दिग्दर्शित करताना दिसला होता.

 या चित्रपटात अनुष्का शर्मासोबत ऐश्वर्या राय बच्चन, फवाद खान, शाहरुख खान देखील छोट्या भूमिकेत होते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या भूमिकेसाठी शाहरुख खान करणची पहिली पसंती नव्हता. 

ताहिर खानची भूमीका

शाहरुख खानने 2016 मध्ये आलेल्या 'ए दिल है मुश्किल' या रोमँटिक चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनचा माजी पती ताहिर तालियार खानची भूमिका साकारली होती. अर्थात या चित्रपटात शाहरुख खानने छोटी भूमिका केली असली तरी नेहमीप्रमाणेच त्याच्या अभिनयाने सर्वांनाच प्रभावित केले. 

ही भूमीका शाहरुखसाठी नव्हती

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटातील आपल्या अभिनयासाठी सर्वांकडून प्रशंसा मिळवणारा शाहरुख खान या भूमिकेसाठी करण जोहरची पहिली पसंती कधीच नव्हता. या चित्रपटासाठी करण जोहरने इंडस्ट्रीतील आणखी काही कलाकारांशी संपर्क साधला होता. मात्र, शेवटच्या क्षणी काही मजबुरीमुळे त्याने माघार घेतली आणि शाहरुखने चित्रपटात प्रवेश केला. 

शाहरुखऐवजी हा अभिनेता

आता प्रश्न असा पडतो की हा अभिनेता कोण होता ज्याला करण जोहर या चित्रपटात ऐश्वर्याचा आधीचा पती म्हणून प्रेक्षकांसमोर सादर करू इच्छित होता. वास्तविक, ताहिर तालियार खानच्या कॅमिओ रोलसाठी करण जोहरची पहिली पसंती सैफ अली खान होता. 

सैफने ताहिरची भूमिका करावी अशी करणची इच्छा होती कारण सैफची व्यक्तिरेखा त्याने लिहिलेल्या भूमिकेला अनुकूल आहे असे त्याला वाटले आणि सैफनेही या चित्रपटाचा भाग होण्यास होकार दिला. पण नंतर असे काही घडले की त्यांना मागे हटावे लागले.

म्हणून शाहरुखने केले काम

अखेरच्या क्षणी अभिनेता जखमी झाल्याने सैफला चित्रपटातून माघार घ्यावी लागली. सैफला त्याच्या दुखापतीवर उपचार घ्यावे लागले त्यामुळे त्याच्या तारखा निश्चित होऊ शकल्या नाहीत आणि शेवटच्या क्षणी करणने शाहरुख खानला कास्ट करण्याचा निर्णय घेतला. 

करण जोहरसोबतच्या मैत्रीमुळे शाहरुख खानने लगेचच चित्रपटात भूमिका करण्यास होकार दिला. शाहरुख खानचा करण जोहरसोबतचा हा तिसरा चित्रपट होता. याआधी दोघांनी 'कुछ कुछ होता है' आणि 'कभी खुशी कभी गम' सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. 

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

SCROLL FOR NEXT