successful Launching of Aditya L1  Dainik Gomantak
मनोरंजन

"अपुन अभी सुरज पे है" आदित्य L1 च्या प्रक्षेपणानंतर सोशल मिडीयावर 'मीम्स'चा पूर...

सुर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने पाठवलेल्या आदित्य L1 चा देशभरात जल्लोष होत असताना आता सोशल मिडीयावर मीम्स व्हायरल होत आहेत.

Rahul sadolikar

Memes Viral after successful Launching of Aditya L1 : चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेनंतर आता भारताने सुर्यावरच्या मोहिमेचा यशस्वी आरंभ केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शनिवारी (2 सप्टेंबर) श्रीहरिकोटा येथून भारताची पहिली सौर मोहीम, आदित्य-L1 यशस्वीरित्या प्रक्षेपित केली. 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश बनण्याचा इस्रोच्या ऐतिहासिक पराक्रमानंतर भारतासाठी ही ऐतिहासिक कामगिरी आहे. 

आदित्य-L1 अंतराळयान पीएसएलव्हीच्या चौथ्या टप्प्यापासून यशस्वीरित्या वेगळे झाले आहे आणि अवकाशात आपला कायमचा प्रवास सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोशी संबंधित शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे. स्पेस एजन्सीने हा टप्पा गाठला म्हणून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अभिनंदन संदेशांचा वर्षाव सुरू झाला.

चांद्रयान-3 च्या यशानंतर आदित्य-L1 मिशन यशस्वीपणे प्रक्षेपित केल्याबद्दल ISRO चे अभिनंदन करण्यासाठी X (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्ते मायक्रोब्लॉगिंग साइटवर आनंद व्यक्त केला आहे. युजर्सनी भारतीय अंतराळ संस्थेला टॅग केले आणि ऐतिहासिक प्रक्षेपणाचे व्हिडिओ शेअर केले.

नेटिझन्सनी X वर शेअर केलेले काही सर्वोत्कृष्ट अभिनंदन संदेश आणि मजेदार मीम्स एकदा पाहाच. ए.आर. रहमानचे 'मां तुझे सलाम' गाणे शेअर करून इस्रोचे अभिनंदन करण्यासाठी सोनी म्युझिकनेही X वर व्हिडीओ शेअर केला आहे .

सूर्याबद्दल थोडसं

सूर्य हा अत्यंत गतीशील तारा आहे. सौरमंडलामध्ये अनेक विस्फोटकारी घटना घडतात. जर असे काही विस्फोट सूर्याकडून पृथ्वीकडे आले तर पृथ्वीच्या अवकाशातील वातावरणात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

याआधीदेखील अनेक अंतराळयाने अशा समस्यांचा शिकार बनले आहेत. भविष्यात अशा काही समस्या निर्माण झाल्या तर त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही मोहिम महत्वाची ठरणार आहे.

मोहिमेचा असा होणार फायदा

सूर्य हा पृथ्वीच्या जवळचा तारा आहे. त्यामुळे अन्य ताऱ्यांच्या तुलनेत सूर्याचा विस्ताराने अभ्यास करणे शक्य आहे. सूर्याच्या अभ्यासातून आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांविषयी अभ्यास करणे आणि जाणून घेणे सोपे होणार आहे, त्यांचा जीवनक्रम जाणून घेण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर इतर आकाशगंगेविषयीदेखील माहीती मिळवता येणार आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे, आत्तापर्यंत न पाहिलेले अल्ट्राव्हायलेट किरणे आदित्य एल-1 मोहमेद्वारे पाहण्यात येणार आहे. पृथ्वी का तप्त होते, सूर्याच्या किरणांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो अशा अनेक घटनांचा अभ्यास आता शक्य होईल .

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT