Ada Sharma In Commando Dainik Gomantak
मनोरंजन

Ada Sharma In Commando: 'द केरला स्टोरी' फेम अदा शर्मा दिसली नव्या अवतारात

Ada Sharma In Commando: अदा शर्माबरोबरच प्रेम परीजा देखील प्रमुख भूमिकेत दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक

Ada Sharma In Commando: 'द केरला स्टोरीज' या चित्रपटाने देशात धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे म्हटले गेले होते. विपुल शाह यांनी दिग्दर्शित केलेल्या द केरला स्टोरी चित्रपटात अदा शर्माच्या अभिनयाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहेत. आता ही जोडी पून्हा एकदा नवीन प्रोजेक्टमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एकत्र येणार आहे.

विपुल शहा कमांडो 2 आणि कमांडो 3 चे दिग्दर्शन केले आहे. आता त्यांच्या कंमाडो या वेब सिरिजमधून ते पून्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या वेब सीरीजचा ट्रेलर रिलिज झाला असून अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. अदा शर्माबरोबरच प्रेम परीजा देखील प्रमुख भूमिकेत दिसून येत आहे. या वेब सीरीजमधून प्रेम परीजा डेब्यू करताना दिसत आहेत.

कमांडोची गोष्ट प्रेम या कमांडोच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे. तो आपल्या देशासोबतच आपल्या कमांडो मित्राला वाचवण्यात यशस्वी होईल का हे आता वेब सीरीज पाहिल्यानंतर समजणार आहे. ट्रेलर( Trailer)मधील अॅक्शन सीन आणि कॉमेडी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत.

आत्तापर्यंत कमांडो वेब सीरीजचे 2 भाग आले आहेत. या दोन्ही भागात अदा शर्मा दिसून आली होती. यानंतर विपूल शहा यांनी केरला स्टोरीमध्ये अदाबरोबर काम केले असून आता पून्हा एकदा ही जोडी कमांडोमध्ये एकत्र दिसणार आहे.

दरम्यान, ही वेबसीरीज डिसने प्लस हॉटस्टारवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 11ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. अदा शर्मा, प्रेम परीजा या कलाकारांसोबतच तिग्मांशु धूलिया, अमित सियाल, श्रेया सिंह चौधरी, इश्तियाक खान, मुकेश छाबड़ा, वैभव तत्ववादी हे कलाकारदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवताना दिसणार आहेत. आता पहिल्या दोन सीजनप्रमाणेच कमांडोची ही गोष्ट प्रेक्षकांचे मन जिंकून घेणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Ganesh Chitrashala: 80 वर्षे जुनी चित्रशाळा, आजही करते गणरायाची सेवा; नातू-पणतूनी ठेवली परंपरा सुरु

Goa Live News: 29 जुलैपर्यंत गोव्यात पावसाचा यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT