Vijay - Tamannah Dainik Gomantak
मनोरंजन

Vijay - Tamannah : विजय वर्मा आणि तमन्नाची मालदिव टूर बनली चर्चेचा विषय... लव्ह बर्ड्सचे फोटो व्हायरल

अभिनेत्री तमन्ना आणि विजय वर्मा सध्या मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. दोघांचे व्हायरल फोटो एकदा पाहाच

Rahul sadolikar

अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्माचं रिलेशन आता लपून राहिले नाही. तमन्ना आणि विजय पहिल्यांदा गोव्यात स्पॉट झाले होते. त्यानंतर दोघांनी आपल्या रिलेशनशीपबद्दल उघडपणे बोलायला सुरूवात केली होती.

आता बी-टाउनचे हे नवीन लव्हबर्ड्स मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत.  दोघे नुकतेच मुंबई विमानतळावर दिसले होते. पण नंतर कळले की ते सुट्टीसाठी एकत्र निघून गेले आहेत. 

तमन्ना भाटियाने तिच्या मालदीवच्या सुट्टीतील काही हॉट फोटो टाकले आहेत, साहजिकच हे फोटो विजय वर्माने क्लिक केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . 

तमन्ना बिकीनी सेटवर

कावला गाण्यावर डान्स करुन चाहत्यांना वेड लावणाऱ्या तमन्नाचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचा भरभरुन वर्षाव केला आहे. फोटोत तमन्ना नीळे पाणी, पांढरे वालुकामय किनारे आणि कॉफीच्या उबदार कपसह आरामशीर वेळ अनुभवताना दिसते. 

फोटोंमध्ये, तमन्नाने स्लिक गुलाबी बिकिनी सेट घातला आहे, तमन्ना भाटिया एका इंद्रधनुष्याच्या बॅकग्राऊंडवर पोज देताना दिसत आहे. 

विजय आणि तमन्ना

बॉलीवूडचे सेलिब्रिटी आरामात वेळ घालवण्यासाठी मालदीव निवडतात. जेलर आणि आखरी सचच्या सुटकेनंतर, तमन्नाने तिचा प्रियकर विजय वर्मासोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी काही वेळ सुट्टी घेतली आहे. 

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची रोमँटिक जोडी यापूर्वीही अनेक ठिकाणी स्पॉट झाली होती. दोघांना अनेकदा मुंबईत डिनर आणि चित्रपटाच्या स्क्रिनींगवेळी एकत्र पाहिले गेले आहे. 

या दोघांनी लस्ट स्टोरीज 2 मध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली आहे आणि वेब सीरिजच्या सेटवर तर त्यांच्या प्रेमकथा सर्वांना समजली होती. 

वर्क फ्रंटवर विजय वर्मा नेटफ्लिक्सच्या 'जाने जान', जो 2005 मधील कादंबरीचे रूपांतर- द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स मध्ये दिसणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित, या चित्रपटात करीना कपूर खान आणि जयदीप अहलावत देखील आहेत.

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT