Swara Bhasker Pregnancy News Dainik Gomantak
मनोरंजन

Swara Bhasker Pregnancy News : स्वरा भास्करने होणाऱ्या बाळासाठी पाळणा केला तयार... फोटो एकदा पाहाच

अभिनेत्री स्वरा भास्करच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांबद्दल त्या खऱ्या की खोट्या हे ठरवणं चाहत्यांना मुश्किल झालं होतं ;पण आता स्वराने स्वत:च काही फोटो शेअर करत हे वृत्त खरे असल्याचं सिद्ध केलं आहे.

Rahul sadolikar

अभिनेत्री स्वरा भास्कर तिने केलेल्या आंतरधर्मीय विवाहामुळे बरीच ट्रोल झाली होती. तिने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्न केले. तिच्या लग्नानंतरच्या काहीच काळात तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांनी सोशल मिडीयावर मोठाच गोंधळ निर्माण झाला होता. स्वराने आता स्वत:च ही बातमी खरी असल्याचं फोटो शेअर करत सांगितलं आहे.

स्वराने नुकताच शेअर केला फोटो

स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे. ती सात महिन्यांची गरोदर आहे. अशा परिस्थितीत स्वराच्या घरी बाळाच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. स्वराने बाळासाठी पाळणा सजवला आहे,. स्वराने इंस्टाग्रामवर सजवलेल्या पाळण्याचा स्वत:सोबत एक क्यूट फोटोही शेअर केला आहे.

पाळणा सजवला पण त्यात कुणीतरी दुसरंच झोपलं...

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांचा आनंद घेत आहे. ती सात महिन्यांची गरोदर आहे. काही दिवसांनी स्वराचे घर बाळाच्या रडण्याचा आवाजाने घुमणार आहे. 

प्रसूतीची तारीख जवळ आल्याने त्यांनी तयारीही सुरू केली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा बेबी बंप दाखवणारा एक नवीन फोटो शेअर केला आणि सांगितले की तिने होणा-या बाळासाठी घरकुल सजवले होते, पण ते कोणीतरी ताब्यात घेतले होते.

स्वराने पतीला टॅग केले

स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे युवा नेते फहाद अहमद यांच्याशी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत लग्न केले आणि ६ जून रोजी गरोदरपणाची घोषणा केली. नवीन फोटो शेअर करताना तिने सांगितले की, बाळासाठी खोलीत घरकुल बनवण्यात आले होते. 

बाळाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. पुढील फोटोमध्ये, स्वराने फोटो शेअर करत दाखवले की तिच्या पाळीव मांजरीने पाळण्यावर कसा ताबा मिळवला आहे आणि ते मांजर पाळणा सोडून कुठेही जात नाही. स्वराने पती फहादला टॅग करत त्याने लिहिले, 'तुझे पहिले मूल.'

स्वराचे चित्रपट

स्वरा भास्कर 'रांझना', 'निल बट्टे सन्नाटा' आणि 'तनु वेड्स मनू' सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. ती बॉलीवूडमधील दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांपेक्षाही ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

SCROLL FOR NEXT