Sherlyn Chopra on Rahul Gandhi Dainik Gomantak
मनोरंजन

Sherlyn Chopra on Rahul Gandhi : शर्लिन चोप्रा म्हणते राहुल गांधींशी लग्न करेन ;पण या अटीवर...

वादग्रस्त अभिनेत्री शर्लिन चोप्रा राहुल गांधी यांच्यासोबत लग्न करण्यासंदर्भात बोलल्यामुळे सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे.

Rahul sadolikar

Sherlyn Chopra wants Marry With Rahul Gandhi : वादग्रस्त म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शर्लिन चोप्रा सध्या एका वक्तव्यामुळे सोशल मिडीयावर चर्चेत आहे. शर्लिन चोप्रा तिच्या बोल्ड मूव्हसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती अनेकदा तिचा प्रत्येक लूक शेअर करत असते. 

शर्लिन चोप्राने नुकतेच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. शर्लिनने खा. राहुल गांधींशी लग्न करण्यासाठी अट घातली आहे. शर्लिनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शर्लिन म्हणाली

बोल्डनेस आणि बोल्ड फोटोशूटसाठी प्रसिद्ध असलेली शर्लिन चोप्रा लाइमलाइटमध्ये राहण्याची एकही संधी सोडत नाही. ती अनेकदा एक ना एक विधान करत राहते ज्यासाठी तिला ट्रोल केले जाते. मात्र अभिनेत्रीला हे काही पटत नाही. नुकतेच त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल असे काही बोलले, की कोणाचेही कान टवकारतील.

शर्लिनचे बोल्ड व्हिडीओ

शर्लिन चोप्रा आजकाल एक बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. साडी असो किंवा शॉर्ट ड्रेस, शर्लिनचे प्रत्येक स्टाईलमधले व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच तिने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याशी लग्न करण्याच्या तिच्या पसंतीबद्दल सांगितले. खरे तर शर्लिन राहुलसोबत सेटल होण्याचे स्वप्न पाहत आहे असंच तिच्या विधानावरुन वाटते.

शर्लिनने राहुल गांधींसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिला विचारण्यात आले की, ‘तुला राहुल गांधींसोबत लग्न करायला आवडेल का?’ उत्तरात ती म्हणाली, ‘हो का नाही.’ पण यासाठी शर्लिनने एक अटही ठेवली.

शर्लिनचा बोल्ड लूकमधला एक व्हिडीओ व्हायरल

शर्लिन टीव्ही शो 'बिग बॉस 3' ची स्पर्धक राहिली आहे. सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान ती थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये दिसली, ज्यामध्ये तिचा बोल्ड लूक पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. यावेळी शर्लिनने चाहत्यांसोबत सेल्फीही काढली.

यादरम्यान तिला प्रश्न विचारण्यात आला की, तिला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत लग्न करायला आवडेल का? असे विचारण्यात आले, यावर उत्तरात शर्लिनने हो म्हटलं. पण लग्नानंतर आडनाव बदलू नये, अशी अट तिने घातली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडीओवर आता यूजर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत.

शर्लिनची आगामी सिरीज

शर्लिनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती पौराशपूर सीझन 2 मध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती रॉयल क्वीन स्नेहलताच्या भूमिकेत आहे. ही सिरीज तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म Alt Balaji वर पाहता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: Goa Rain: पुन्हा पावसाचा इशारा!

SCROLL FOR NEXT