Priyanka Chopra Dainik Gomantak
मनोरंजन

Priyanka Chopra: चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेनंतर प्रियांका चोप्राने केलं अभिनंदन, शेअर केली पोस्ट

Rahul sadolikar

Priyanka Chopra on Chandrayaan-3 Moon Landing: 23 ऑगस्ट रोजी भारताने चांद्रयान मोहिम यशस्वी करत इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक यशानंतर जगभरातून भारताचं अभिनंदन होत आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचा आनंद पोस्ट शेअर करत साजरा केला आणि चांद्रयान 3 बुधवारी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्याबद्दल इस्रोच्या टीमचे अभिनंदन केले.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरवल्यानंतर प्रियांका चोप्रा भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे.

प्रियांकाची पोस्ट

प्रियांकाने चंद्रावरील छायाचित्रे शेअर केली आणि तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, "चंद्रावर भारत.#प्राउड. चांद्रयान 2 यशस्वी केल्याबद्दल @ISRO चे अभिनंदन.

" बुधवारी संध्याकाळी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर, चांद्रयान 3 ने चंद्राची धूळ स्थिर होण्याची वाट पाहिली आणि प्रज्ञान रोव्हर बाहेर काढण्यास सुरुवात केली. 

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रापासून सुरू झालेल्या ४० दिवसांच्या प्रवासानंतर हे लँडिंग झाले.

भारत हा जगातला 4 था देश

चांद्रयान माहिमेनंतर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा चौथा देश बनला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला स्पर्श करणारा भारत आता पहिला देश बनला आहे.

प्रियांकाने नुकतेच अनिल शर्मा दिग्दर्शित गदर 2 चित्रपटाच्या यशाबद्दल अभिनंदन केले. तिने या प्रसंगी त्यांना एक स्वत: लिहिलेले पत्र आणि फुले पाठवली. अनिलने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आणि लिहिले: "Thx @priyankachopra आणि @nickjonas तुमच्या शुभेच्छांस ठी... हे खरोखर माझ्या हृदयाला स्पर्शून गेले #Gadar2."

Priyanka Chopra

प्रियांकाचा अनिल शर्मांना पत्र

प्रियांकाने तिच्या पत्रात लिहिले, “प्रिय अनिल सर, गदर 2 च्या उत्कृष्ट यशाबद्दल अभिनंदन! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! खूप प्रेम, प्रियांका आणि निक.

प्रियांकाने अनिल शर्माचा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये ऑनस्क्रीन पदार्पण केले होते. प्रियांकासोबत सनी देओल आणि प्रीती झिंटा यांचा द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय 2003 मध्ये रिलीज झाला होता.

प्रियांकाची सिटाडेल सिरीज

रिचर्ड मॅडन सोबत प्राइम व्हिडीओच्या सिटाडेलमध्ये अलीकडे प्रियांका दिसली होती  . पुढे तिचा आणखी एक हॉलिवूड चित्रपट रिलीज होण्याच्या तयारीत आहे. ती लवकरच हेड्स ऑफ स्टेट या अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे ज्यात जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT