नवी दिल्ली: महाराष्ट्रात प्रिती तलरेजा नावाची एक अभिनेत्री सोशल मीडियावर न्यायाची मागणी करत आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रिती तलरेजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराविरोधात आवाज उठविला आहे. प्रितीने पती अभिजित पेटकर विरोधात कल्याण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रिती तलरेजाने तिच्या (मुस्लिम) पतीवर धर्म परिवर्तन, शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. प्रिती सांगते की पुरावे सादर करूनही तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला जात नाही.
प्रीती तलरेजाने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 'मी खडकपाडा पोलिस ठाण्यात आणि एसीपी / डीसीपी कार्यालयातही फसवणूक आणि जबरदस्ती धर्मांतरण आणि अगदी मानसिक व शारीरिक छळाची तक्रार दाखल केली आहे, पण तुमच्या बाजूने कोणताही प्रतिसाद आला नाही. या ट्विटसह प्रितीने मुंबई पोलिस आणि सीएमओ महाराष्ट्रला टॅग केले.
त्यानंतर प्रीती तलरेजाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग केले, असे लिहिले आहे, 'आदरणीय मुख्यमंत्री महोदय, माझ्या नवऱ्याने प्रेमाच्या नावावर माझी फसवणूक केली माझा वापर केला. त्याने माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला आहे,’ एवढच नव्हे तर प्रितीने आणखी एक खुलासा केला आहे. अभिजित आणि प्रितीचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना दहा महिन्याची एक मुलगी देखील आहे. प्रितीने पोस्टमध्ये अभिजित एक मुस्लिम असून, त्यांने माझ्याशी निकाह केला होता. पण मुस्लिम कायद्याअंतर्गत त्यांला लग्नाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. आता अभिजित तिला धर्मपरिवर्तन करण्यासाठी मारहाण आणि शारिरीक छळ करत असल्याचे तिने पोस्टमध्ये सांगितले आहे.
'मी जन्माने हिंदू आहे आणि हिंदूच मरेन ' . माझे आवाहन आहे की आपल्या मुलीला एकटे सोडू नका. माझे कुटुंब माझ्या बरोबर आहे म्हणून मी येथे पोहोचण्याचे धाडस केले. लोकांना हवे ते सांगू द्या. परंतु आपल्या मुली, बहिण, पत्नी आणि इतर स्त्रियांसाठी हे एक चांगले उदाहरण म्हणून घ्या." असे तीने पोस्टमध्ये म्हटले आहे.
यानंतर प्रितीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा एखादी महिला भारतात आत्महत्या करते तेव्हा निर्दोष शिक्षेस पात्र ठरते पण जेव्हा ती जिवंत असते आणि न्यायासाठी लढत असते तेव्हा तिचा फक्त छळ केला जातो. माझ्यात वास्तव आहे, 'आज 6 जानेवारीच्या ट्वीटमध्ये अभिनेत्रीने एफआयआर झाल्याचे लिहिले आहे, सर्वांचे आभार मानतो पण ही केवळ एक सुरुवात आहे. मी उभे राहून संघर्ष करीन हे मला ठाऊक आहे.
आणखी वाचा:
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.