Pooja Bhatt - Elwish Yadav  Dainik Gomantak
मनोरंजन

Pooja Bhatt : पूजा भट्टने बिग बॉसमधल्या या मित्राला वाढदिवसाला चांदीचे शिवलिंग गिफ्ट दिले...

अभिनेत्री, निर्माती पूजा भट्टने बिग बॉसमधला तिचा मित्र एल्विश यादवला वाढदिवसानिमित्त्य चांदीचे शिवलिंग गिफ्ट दिले आहे.

Rahul sadolikar

Pooja Bhatt has gifted her friend Elvish Yadav a silver Shivling on his birthday : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री, निर्माती पूजा भट्ट चर्चेत आहे. तिच्या एका वादग्रस्त जुन्या फोटोबद्दल तिने काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ कन्नलला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले तेव्हाही पूजाची सोशल मिडीयावर चर्चा झाली होती.

सध्या पूजाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे पूजाने तिचा बिग बॉसमधला मित्र एल्विश यादवला दिलेली एक भेट.

एल्विशला दिलेल्या या बर्थडे गिफ्टमुळे पूजा तिच्या फॅन्सासाठी कौतुकाचं कारण ठरली आहे. चला पाहुया पूजाने आपल्या मित्राला असं काय गिफ्ट दिलं आहे.

एल्विश यादवचा वाढदिवस

एल्विश यादवने 14 सप्टेंबर रोजी त्याचा 26 वा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी त्याने उर्वशी रौतेलासोबत एक म्युझिक व्हिडिओ देखील रिलीज केला.

बिग बॉस OTT 2 नंतर एल्विश यादव (Elwish Yadav) आणि पूजा भट्ट (Pooja Bhatt) यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पूजाने 14 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त YouTube एन्फ्लूएन्सर एल्विशला चांदीचे शिवलिंग भेट दिले.

चांदीचे शिवलिंग

एल्विश यादवने नुकतीच वयाची 25 शी पार केली आहे. . X (पूर्वीचे ट्विटर) वर बिग बॉसच्या एका चाहत्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, एल्विश एका कारमध्ये बसून पूजाकडून मिळालेली भेटवस्तू दाखवताना दिसत आहे.

 एल्विशने या व्हिडीओमध्ये सांगितले की हे एक चांदीचे शिवलिंग आहे, भगवान शिवाची पूजा करण्यासाठी".

बिग बॉसमधले प्रतिस्पर्धी

एल्विश आणि पूजा या दोघांनी या वर्षाच्या सुरुवातीला Jio सिनेमावर धूमाकूळ घातलेल्या बिग बॉस OTT या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या सीझनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. 

पण एल्विशने अंतिम फेरीत पूजाला पराभूत करून बिग बॉस OTT 2 विजेत्याची ट्रॉफी जिंकली. हा शो सलमान खानने होस्ट केला होता , आणि फिनालेला पूजाचे वडील आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनीही हजेरी लावली होती.

आलिया एल्विशला म्हणाली रॉकी

पूजाची बहीण आणि अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या नवीन ब्लॉकबस्टर चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये रणवीर सिंगने साकारलेल्या शीर्षकाच्या पात्राचा संदर्भ देत, बिग बॉस OTT 2 घरातील एल्विशचा 'रॉकी' म्हणून उल्लेख केला. 

आलियाने सोशल मिडीयावर आस्क मी एनिथिंग सेशनमध्ये एल्विशचा उल्लेख 'सिस्टम' असा उल्लेख केला.

एल्विशचा व्हिडीओ रिलीज

बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादवने अभिनेत्री उर्वशी रौतेला सोबत एक नवीन संगीत व्हिडिओ, हम तो दिवाने देखील रिलीज केला.

पूजा भट्ट 2022 मध्ये आर बाल्की यांच्या 'चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' या थ्रिलरमध्ये मनोविश्लेषक म्हणून दिसली होती.

Goa Liberation Day: नेहरूंनी दिलेला 'तो' एक आदेश अन् गोवा झाला मुक्त; वाचा 36 तासांच्या धडाकेबाज मोहिमेचा थरार

Horoscope: ग्रहांची शुभ स्थिती! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Syed Mushtaq Ali Trophy 2025: ईशान किशनचं वादळ अन् झारखंडचा ऐतिहासिक विजय; फायनलमध्ये हरियाणाचा धुव्वा उडवत पटकावलं विजेतेपद! VIDEO

Goa Robbery Incident: गेस्ट हाऊसमध्ये घुसून जर्मन पर्यटकाची लूट, 18 वर्षाच्या भामट्याला बेळगावात अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

गोव्यात नाताळची जय्यत तयारी! बाजारपेठांमध्ये 'ख्रिसमस'ची धूम; 10 फुटी झाडांनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT