Irfan Patel- Payal Ghosh Dainik Gomantak
मनोरंजन

Gautam Gambhir: अभिनेत्री पायल घोषचा गौतम गंभीर बाबत खळबळजनक खुलासा; म्हणाली 'मी इरफानबरोबर नात्यात असताना तो...'

दैनिक गोमन्तक

Gautam Gambhir: पायल घोष ही बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेक चित्रपट, मालिका आणि डेली सोप यांचा एक भाग आहे. यामुळे तिला प्रचंड स्टारडम मिळाले आहे. मात्र अभिनेत्री नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे बरेच लक्ष वेधून घेते.

इरफान पठाणला पाच वर्षांपासून डेट करत असल्याचा दावा करण्यापासून ते मोहम्मद शमीशी लग्न करण्याची आणि त्याची दुसरी पत्नी बनण्याची इच्छा व्यक्त करण्यापर्यंत पायल तिच्या विधानांमुळे चर्चेत आली आहे.

Payal Ghosh Tweet

पायल घोषने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक नोट लिहित तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. पायल म्हणते, मी जेव्हा इरफान पठाणला डेट करत होते तेव्हा गौतम गंभीर तिला मिस कॉल द्यायचा. ती पुढे म्हणाली की इरफानला संपूर्ण गोष्ट माहित आहे. बडोद्यात मॅच होती, तेव्हा मी इरफानला भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा इरफानने हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि युसूफ पठाण यांना याबद्दल कल्पना दिली होती.

आणखी एका पोस्टमध्ये पायलने इरफान पठाणसोबतचा स्वतःचा एक फोटो पोस्ट केला. फोटो पोस्ट करत इरफान आणि तीचे ब्रेकअप झाल्यानंतर ती आजारी पडल्याचा खुलासा केला. पायल आपल्या पोस्टमध्ये म्हणते, त्यांच्या ब्रेकअपनंतर, ती अनेक वर्षे काम करू शकली नाही, ती फक्त त्याच्यावरच प्रेम करते आणि इतर कोणावरही नाही. पुढे तिने असेही म्हटले होते की, गौतम गंभीर, अक्षय कुमार माझ्या मागे लागले होते मात्र माझे फक्त इरफान पठाणवरच प्रेम होते.

नोव्हेंबर 2023 मध्ये, विश्वचषक 2023 फायनलदरम्यान, पायल घोषने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले जेव्हा तिने ट्विटरवर मोहम्मद शमीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तिने अनुराग कश्यपने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपदेखील केला होता. आता पायल घोषच्या या दाव्यावर गौतम गंभीर आणि इरफान पठाण काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT