manisha koirala nepal Dainik Gomantak
मनोरंजन

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Manisha Koirala Nepal Politics: बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला हिने मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आजोबांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली

Akshata Chhatre

Manisha Koirala Statement Viral: बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला हिने मंगळवारी (९ सप्टेंबर) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या आजोबांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. तिचे आजोबा, बी. पी. कोईराला हे नेपाळचे पहिले निर्वाचित पंतप्रधान होते. सध्या संपूर्ण देशात तरुणांच्या नेतृत्वाखालील आंदोलनांनी जोर पकडला असताना मनीषा कोईरालाने केलेली ही पोस्ट चर्चेचा विषय बनलीये.

कोईराला यांनी आपल्या आजोबांच्या योगदानाला उजाळा देत लोकशाही आणि संघर्षाबद्दल त्यांच्या विचारांवर भर दिला. समाजात आपला आवाज असणे किती महत्त्वाचे आहे, यावरही त्यांनी भर दिला आणि 'भ्रष्टाचाराच्या विरोधात विद्यार्थ्यांचा वाढता उठाव' याबद्दलही सांगितले.

त्यांनी बी. पी. कोईराला यांच्या जुन्या फोटोसोबत एक संदेश लिहिला, ज्यात म्हटले आहे की, "बी.पी. बा यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली नेपाळचे पहिले निर्वाचित पंतप्रधान आणि एक लेखक, ज्यांनी प्रेम आणि संघर्षाला आवाज दिला. विद्यार्थी आज भ्रष्टाचार आणि स्वातंत्र्यासाठी उभे असताना, त्यांचे शब्द कालातीत वाटतात: ‘लोकशाही अविभाज्य आहे; जर तुम्हाला तुमच्या घरात लोकशाही हवी असेल, तर तुम्ही त्यासाठी होणारे सर्व संघर्ष दुर्लक्षित करू शकत नाही."

गेल्या आठवड्यात सरकारने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बंदी घातल्यानंतर नेपाळमध्ये हे आंदोलन सुरू झाले. सुरक्षा दलांनी संसदेवर धडक देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवर रबर बुलेट्स आणि अश्रुधुराचे गोळे झाडल्यानंतर २० लोकांचा मृत्यू झाला, तर १०० लोक जखमी झाले. या हिंसाचारानंतर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी ९ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला.

सरकारने निर्बंध हटवले असले तरी, अनिश्चित काळासाठी लागू असलेल्या संचारबंदीनंतरही निदर्शने सुरूच आहेत. यापूर्वी, कोईरालाने एका दिवसापूर्वी एका रक्त-डागलेल्या बुटाचा फोटो शेअर करून सुरू असलेल्या निदर्शनांवर आपली प्रतिक्रिया दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT