Janhvi Kapoor's New House Dainik Gomantak
मनोरंजन

Janhvi Kapoor's New House: जान्हवी कपुरच्या मुंबईतील नव्या घराची किंमत माहितीय?

वांद्र्यात घेतला 8,669 चौरस फुट क्षेत्रफळ असलेला दुमजली बंगला

गोमन्तक डिजिटल टीम

Janhvi Kapoor's New House: अभिनेत्री जान्हवी कपूर हीने नुकतेच मुंबईतील वांद्रे परिसरात पाली हिल भागात एक डुप्लेक्स घर खरेदी केले आहे. या घराची किंमत 65 कोटी रूपये आहे. जान्हवीने 12 ऑक्टोबर रोजी हा बंगला खरेदी केला होता, त्यासाठी तिने 3.90 कोटी रूपये स्टँप ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरले आहे.

जान्हवीचा हा बंगला 8,669 चौरस फुटांचा असून यात एक खासगी ओपन गार्डन, स्विमिंग पूल, 5 कार्ससाठी पार्किंगची जागा एवढी जागा आहे.

जान्हवीने तिचे जुने घर अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) याला विकले होते. ते घर 3456 चौरस फुटांचे होते. हे घर तिने डिसेंबर 2020 मध्ये 39 कोटी रूपयांत खरेदी केले होते. ते घर तिने राजकुमार रावला 44 कोटी रूपयांना विकले होते.

नुकताच जान्हवीचा 'मिली'हा चित्रपट रीलीज आला आहे. हा मल्याळम 'हेलन' या चित्रपटाचा रीमेक आहे. यात एक तरूणी फ्रिजरमध्ये अडकते आणि मग ती फ्रिजरमधून कशी बाहेर पडते, याची कहाणी आहे. आगामी काळात ती 'मिस्टर अँड मिसेस माही', 'बवाल', 'तख्त', 'दोस्ताना 2' आणि 'किट्टी' या चित्रपटांमध्ये प्रमुख भुमिकेत दिसणार आहे.

जान्हवी, तिची बहिण खुशी आणि वडील बोनी कपूर यांनी ही नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. जान्हवीने यासाठी प्रती चौरस फुटाला 1 लाख रूपये मोजले आहेत. अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने याचवर्षी क्वाड्रॅुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला होता. वांद्रे पश्चिम येथे असलेल्या या फ्लॅटची किंमत 119 कोटी रूपये इतकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT