Actress Dia Mirza Dainik Gomantak
मनोरंजन

Dia Mirza On Bheed : "हा विषमता आणि सामुहिक शक्तीवर भाष्य करणारा चित्रपट"...'भीड'वर ही अभिनेत्री बोलली...

अनुभव सिन्हा दिग्दर्शित भीड या चित्रपटावर अभिनेत्री दिया मिर्जा बोलली आहे.

Rahul sadolikar

अभिनेत्री दिया मिर्जा सध्या अधुनमधुन कुठल्या चित्रपटात दिसत असली तरी तिला प्रेक्षक विसरले नाहीत हे नक्की 2000 च्या दशकात राम माधवन आणि दिया मिर्जाचा 'रेहना है तेरे दिल मे' हा चित्रपट प्रेक्षकांना अजुनही विसरता आला नाही.

आता सध्या दिया मिर्जा अनुभव सिन्हा दिग्दर्शित भीड या चित्रपटात एका महत्वाच्या भूमीकेत दिसणार आहे. दिया सध्या या चित्रपटावर केलेल्या एका कमेंटमुळे चर्चेत आहे.

रिलीजच्या काही दिवसांतच, भीडचा ट्रेलर 1947 च्या भारताच्या फाळणीची तुलना कोविडच्या काळात लॉकडाऊन दरम्यानच्या स्थलांतरित मजुरांच्या स्थितीशी केल्याबद्दल वादात सापडला होता. 

प्रोमो नंतर बदलला गेला असताना अभिनेत्री  दिया मिर्झाने आता चित्रपटावर एक कमेंट केली आहे. तिचा असा विश्वास आहे की या चित्रपटाच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाची कथा आहे. 2020 च्या लॉकडाऊन दरम्यान समाजातील उपेक्षित घटकांवर झालेल्या अन्यायाकडे पाहणाऱ्या अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनाचा भाग असल्याचा तिला अभिमान आहे. 

“अनुभवच्या अलीकडच्या चित्रपटांप्रमाणेच, भिड हा एक मानवी भावनांचा स्क्रिप्टसह विचार करायला लावणारा चित्रपट आहे जो केवळ तीव्र सामाजिक विषमतेवरच नव्हे तर वैयक्तिक आणि सामूहिक शक्तीवरही केंद्रित आहे. हे कोविड-19 लॉकडाऊनच्या घटनांदरम्यान सेट केले गेले आहे जे आम्हाला अजूनही स्पष्टपणे आठवते,” 
थप्पड (2020) नंतर तीन वर्षांनी अनुभव सिन्हासोबत पुन्हा एकत्र काम करणारी दिया सांगते . तिने प्रॉमिस केले आहे की तिची भूमिका "लोकांना पूर्णपणे आश्चर्यचकित करेल".

या चित्रपटात राजकुमार रावची मुख्य भूमिका आहे, भूमी पेडणेकर, पंकज कपूर आणि कृतिका कामरा, मिर्झाचे पात्र भारताच्या उच्च वर्गाचे प्रतिनिधित्व करते. दिया एका काम करणा-या आईची भूमिका करते जिच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल होतो जेव्हा लॉकडाऊनमुळे तिला तिच्या मुलाकडे घरी जाणे अशक्य होते. 

या चित्रपटाची निवड करणे कठीण होते हे नक्कीच या कठीण परिस्थितीत आपल्या नैतिकतेची कशी कसोटी लागते हे दिग्दर्शक दाखवतो. दिया मिर्झासाठी, तीने याआधी साकारलेल्या कोणत्याही भूमिकेपेक्षा ही भूमीका नक्कीच वेगळी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Midterm Elections Result: महागाई, भ्रष्टाचार अन् इराण युद्ध पडले महागात! ट्रम्पला अमेरिकन जनतेचा मोठा दणका; डेमोक्रॅट्सचा दणदणीत विजय

Modi Cabinet Decision: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची खूशखबर! अग्निवीरांना मिळणार 2 वर्षांचा सेवा विस्तार; लाखो जवानांना मोठा दिलासा

VIDEO: "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं!", अर्शदीपच्या खास 'डान्स स्टेप'चा व्हिडिओ तुफान व्हायरल; चाहत्यांचं जिंकलं मन

कर्तव्यात कसूर अन् युद्धनौका धोक्यात आणल्याचा ठपका! INS ब्रह्मपुत्र दुर्घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल; भारतीय नौदलाची मोठी कारवाई

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

SCROLL FOR NEXT