Vicky Kaushal Dainik Gomantak
मनोरंजन

Vicky Kaushal : वडिलांचा सेटवर झालेला अपमान, आईसमोर त्यांचं रडणं, 'विकी कौशल'ला आजही सारं आठवतं...

अभिनेता विकी कौशलने त्याच्या आयुष्यातला एक भावुक प्रसंग शेअर केला आहे.

Rahul sadolikar

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. तेव्हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून 'सरदार उधम' या चित्रपटाला पुरस्कार मिळाला. हा चित्रपट स्वातंत्र्य लढ्यातील महान सेनानी सरदार उधम सिंह यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने मुख्य भूमीका साकारली आहे. विकी एक उत्तम अभिनेता आहेच ;पण सध्या सोशल मिडीयावर विकी कौशलच्या एका संवेदनशील रुपाचेही दर्शन त्याच्या चाहत्यांना झाले आहे

विकीचे वडील शाम कौशल

विकी कौशलचे वडील शाम कौशल यांना बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टंटमन म्हणून ओळखले जाते. शाम कौशल यांच्यासाठी इंडस्ट्रीतील सुरुवातीचे दिवस खूपच संघर्षाचे होते. त्या दिवसांत शाम कौशल यांना सेटवर लोकांकडून खूप काही ऐकावे लागले.

कित्येकदा शाम कौशल यांना अपमानास्पद वागणूक मिळायची. अशाच एका प्रसंगाची आठवण विकीने शेअर केली आहे.

विकीच्या वडिलांचा अपमान

विक्की कौशलचे त्याचे वडील शाम कौशल यांच्याकडून अभिनयाची संधी मिळाली. विकीचे वडील फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात मोठे स्टंटमन आहेत. मात्र, आज त्यांची स्थिती वेगळी आहे आणि इंडस्ट्रीत क्वचितच कोणी असेल जो त्यांना ओळखत नसेल. 

पण एक वेळ अशी आली की सेटवर त्याचा अपमान व्हावा लागला. विकी कौशलने त्याच्या वडिलांच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. सेटवर शाम कौशल यांना अपमानाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर ते विकीच्या आईसमोर येऊन रडले होते .

विकी कौशल आणि भावाला मिळाली प्रेरणा

अभिनेता विकी कौशलने सांगितले आहे की, त्याच्या वडिलांनी त्याला आणि त्याच्या भावाला जीवनातील अडचणींचा सामना करण्यास आणि त्यांच्याशी लढा देऊन पुढे जाण्यास कसे शिकवले. 

वडिलांमुळेच तो आज भावनिकदृष्ट्या खंबीर झाला आहे, असंही विकीने सांगितले. वी आर युवाला दिलेल्या मुलाखतीत विकीचा भाऊ सनी कौशलने सांगितले की, जेव्हा वडील नाराज होते, तेव्हा ते आईसमोर रडले होते, पण त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना खंबीर व्हायला शिकवले आहे.

सेटवर झालेला अपमान

सेटवर शाम कौशल यांचा अपमान झाला तेव्हाच्या वाईट काळाची आठवण करून विकी म्हणाला, 'माझ्या आम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी आज मला सेटवर खूप अपमानास्पद वाटले आणि मी परत आलो, असे ते सांगायचे. आईसमोर ते रडायचे असेही त्याने सांगितले. 

आम्ही लहान असताना ते आम्हाला हे सर्व सांगायचे आणि आई आम्हाला सांगायची की एकदा असे घडले, तसे घडले आणि त्यांच्या काही सिनिअर्सनी त्यांना सर्वांसमोर सेटवर फटकारले. 

तेव्हा ते फक्त स्टंटमॅन होते. ते घरी परत आले आणि रडायला लागले. त्यामुळे या गोष्टी आमच्यापासून कधीच लपल्या नव्हत्या.

मूल पडले तर स्वत:च उठेल

आपल्या वडीलांनी शिकवलेले संस्कार सांगताना विकी पुढे म्हणाला त्यांनी आपल्या मुलांना महत्त्वाचा सल्लाही दिला. विकी कौशलने सांगितले की, तो मुलांना सांगायचा, 'वेळ नेहमी तुमच्या मनाप्रमाणे जाणार नाही, बऱ्याचदा वेळ तुमच्या विरोधात असेल आणि यालाच आयुष्य म्हणतात. 

जेव्हा आम्ही पडायचो तेव्हा आम्हाला ते उचलायचे नाही, ते आईला सांगायचे की मूल पडलं तर स्वतःच उठेल. हीच विकीची प्रेरणा होती असं तो सांगतो.

विकीचा आगामी चित्रपट

विकी कौशल सध्या त्याचा आगामी चित्रपट 'द ग्रेट इंडियन फॅमिली'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात मानुषी छिल्लरही मुख्य भूमिकेत आहे. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित विकीचा हा चित्रपट या महिन्यात २२ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मानिकशॉ यांची भूमीका

आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं तर विकी कौशल मेघना गुलजारच्या पुढच्या 'सॅम बहादूर' या चित्रपटातही दिसणार आहे, जी भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची कथा आहे.

 दिग्दर्शक आनंद तिवारी यांच्या आगामी चित्रपटात तृप्ती डिमरी आणि एमी विर्क देखील दिसणार आहेत. विकीचा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT