Prabhas Kriti Sanon Relationship Dainik Gomantak
मनोरंजन

Prabhas Kriti Sanon Relationship: प्रभास-कृती यांच्या डेटिंगबद्दल काय म्हणाला वरूण धवन?

सोशल मीडियात वरूण धवनचा व्हिडिओ व्हायरल

Akshay Nirmale

Varun Dhawan On Prabhas Kriti Relationship: बी टाऊनमध्ये गेल्या काही काळापासून अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री कृती सेनन यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू आहे. या कथित कपलच्या रिलेशनशिपबाबत आता चक्क अभिनेता वरूण धवननेच हिंट दिली आहे. वरूणचा याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

वरूण धवन आणि कृती सेनन यांचा ‘भेड़िया’ हा चित्रपट नुकताच रीलीज झाला आहे. वरूण आणि कृती दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. त्यातच एका व्हिडिओमध्ये वरूणने कृती आणि प्रभासच्या यांच्यातील नात्यावर भाष्य केले आहे. ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमधील हा व्हिडिओ असून येथे वरूण आणि कृती आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते.

या व्हिडिओत या शोचा जज करण जोहर वरूणला विचारतो की, यात कृतीचे नाव का नाही. त्यावर कृतीही म्हणते की, मी देखील हाच प्रश्न विचारणार होतो. पण त्यावर वरूण म्हणतो की, यावर कृतीचे नाव नाही कारण तिचे नाव कुणाच्या तरी मनात आहे. त्यावर करन जोहर विचारतो की, कुणाच्या मनात. त्यावर वरूण म्हणतो की, एक व्यक्ती आहे, जो मुंबईत नाही. तो सध्या दीपिकासोबत शुटिंग करत आहे. वरूणच्या या उत्तरावर कृती सेनन ब्लश करू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रभास आणि कृती सध्या रिलेशनशिपिमध्ये असल्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. नुकताच कृतीने एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये प्रभासने कृतीला डार्लिंग म्हटले होते. तथापि, दोघे एकमेकांना डेट करत आहे की नाहीत, याबाबत दोघांनीही चुप्पी साधली आहे. प्रभास आणि कृती दोघेही ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरूष'मध्ये एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांमध्ये रिलेशनशिपला सुरवात झाल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रीलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT