Rajnikanth on Alcohol Addiction Dainik Gomantak
मनोरंजन

Rajnikanth on Alcohol Addiction : "जर मला दारुचे व्यसन नसते तर"...अभिनेते रजनीकांत यांनी व्यक्त केली खंत

Rahul sadolikar

अभिनेते रजनीकांत आपल्या स्टारडमबद्दल आणि दारुच्या व्यसनाबद्दल पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलले आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांनी दारूचे व्यसन आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे मान्य केले आहे. 

'जेलर'च्या ऑडिओ लॉन्चच्या वेळी थलैवाने सांगितले की, जर त्याला दारूचे व्यसन नसते तर मी मोठा सुपरस्टार झाला असता. एवढेच नाही तर त्याने निर्मात्यांना चित्रपटाच्या क्रेडिट्समधून त्याच्या नावामधून 'सुपरस्टार' हटवण्याचे आवाहन केले आहे.

जेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..

सुपरस्टार रजनीकांत 72 वर्षांचे आहेत. या वयातही ते सक्रिय आहे. त्यांचा तमन्ना भाटियासोबतचा 'जेलर' हा चित्रपट लवकरच १० ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. थलायवाने सिनेमाच्या दुनियेत एक वारसा निर्माण केला आहे ज्यातून आपल्या सर्वांना खूप काही शिकण्यासारखे आहे. 

वयाच्या या टप्प्यावरही ते इतके चैतन्यशील व्यक्ती आहेत, जे आपल्या चुका मान्य करायला मागेपुढे पाहत नाही. अलीकडेच, चेन्नईतील 'जेलर'च्या ऑडिओ लॉन्च इव्हेंटमध्ये त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक तर स्वीकारलीच, पण जगाला त्यातून शिकण्याचा सल्लाही दिला आहे. सुपरस्टारने दारूचे व्यसन ही आपली सर्वात मोठी चूक मानली आहे.

दारुचे व्यसन

रजनीकांत आणि तमन्ना व्यतिरिक्त, चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर देखील लॉन्च कार्यक्रमात उपस्थित होते. रजनीकांत यांनी यावेळी आपल्या दारूच्या व्यसनाबद्दल खुलेपणाने सांगितले. ते म्हणाले, 'माझ्या आयुष्यात दारू नसती तर मी समाजाची सेवा केली असती. दारू पिणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे

दोन वर्षांपूर्वीची ती आठवण

दोन वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देत थलायवा म्हणाला, 'मी एकदा दारूच्या नशेत घरी आलो होतो. नाटकाचे सादरीकरण झाल्यानंतर दुपारी 2 वा. माझ्या भावाने मला फक्त आनंद किंवा उत्सव साजरा करण्यासाठी पिण्याचा सल्ला दिला आणि त्याची सवय करू नका. जर मी दारूचे सेवन केले नसते तर मी मोठा आणि चांगला स्टार झालो असतो. अभिनेता पुढे म्हणाला की, आनंदात मद्यपान करणे वाईट नाही, पण त्याचे व्यसन लागणे अत्यंत चुकीचे आहे.

ऑडिओ लॉन्चच्या वेळी बोलताना रजनीकांत म्हणाले की, 'अन्नत्ते' नंतरच्या अनेक स्क्रिप्ट्स त्यांच्या आधीच्या 'बाशा' आणि 'अन्नमलाई' या चित्रपटांसारख्याच असल्यानं त्यांनी नाकारल्या होत्या. विजय-स्टार 'बीस्ट' रिलीज झाल्यानंतर नेल्सनच्या ऑनलाइन ट्रोलिंगबद्दलही तो बोलला. 

नेल्सनसोबत काम करण्याचा आमचा निर्णय

रजनीकांतने खुलासा केला की, त्यांना वितरकांकडून चित्रपटाचे दिग्दर्शक बदलण्यास सांगणारे अनेक फोन आले होते. मात्र, 'बीस्ट'मधून वितरक आणि प्रॉडक्शन हाऊसचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही त्यांनी समोर आणले. थलैवा म्हणाले, "नेल्सनसोबत काम करण्याच्या माझ्या निर्णयाबाबत मी स्पष्ट होतो आणि काहीही झाले तरी मी जेलरबरोबरच पुढे जाण्याचा निर्णय घेतला."

सुपरस्टार नाव वगळा...

रजनीकांत यांनीही चित्रपटाच्या श्रेयसमधून त्यांच्या नावातून 'सुपरस्टार' हे शीर्षक वगळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी दिग्दर्शकांना 'सुपरस्टार' कार्ड काढून टाकण्याचे आवाहन केले, परंतु निर्मात्यांनी तसे करण्यास नकार दिला. 

आपले भाषण संपवताना त्यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेबद्दल आणि ट्रोलिंगबद्दलही सांगितले. रजनीकांत म्हणाले, 'कुत्रा भुंकत नाही. त्याचप्रमाणे अशी कोणतीही जीभ नाही जी टीका करत नाही. हे दोघे नसतील अशी कोणतीही जागा नाही असा माझा विश्वास आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT