Saina Nehwal & Siddhartha Dainik Gomantak
मनोरंजन

अभिनेता सिद्धार्थने बॅडमिंटन चॅम्पियन सायना नेहवालवर केली अश्लिल शेरेबाजी

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटामधील प्रसिध्द अभिनेता सिद्धार्थ ( Siddhartha) सायना नेहवालवर टिप्पणी करुन वादात सापडला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटामधील प्रसिध्द अभिनेता सिद्धार्थ (Siddhartha) सायना नेहवालवर टिप्पणी करुन वादात सापडला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. इतकेच नाही तर लोकांनी त्याला फ्लॉप अभिनेता देखील म्हटले आहे.

खरं तर, सायना नेहवालने (Saina Nehwal) पंतप्रधानांच्या (Prime Minister Narendra Modi) सुरक्षेतील त्रुटींवर ट्विट करत म्हटलं होतं की, जर स्वत:च्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड होत असेल तर कोणतेही राष्ट्र स्वतःला सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. अराजकवाद्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. यावर अभिनेता सिद्धार्थने म्हटलं की , जगातील लहान कोंबडा चॅम्पियन... देवाचे आभार मानतो की आम्हाला भारताचे तारणहार आहेत.

या आक्षेपार्ह कमेंटनंतर अभिनेता सिद्धार्थला चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. एका युजरने सोशल मिडियावर म्हटले की, अशी भाषा एखाद्यासाठी खासकरुन ज्यांनी देशाला अभिमान वाटावा. हे सर्व पैसे कमावण्यासाठी आहे का? अभिनेता म्हणून तू आधीच हलका आहेस, आता तू माणुसकी गमावली आहेस का? एकाने लिहिले - महिलांसंबधी अशी आक्षेपार्ह शेरेबाजी केल्यामुळे त्याला तात्काळ अटक करण्यात यावी.

तर एका यूजरने म्हटले की, कृपया मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घ्या.. तुमच्या मेंदूने काम करणे बंद केले आहे. ज्यांनी करिअरमध्ये फ्लॉप चित्रपट दिले ते सायनाला शिकवायला आले आहेत. त्याचबरोबर काही लोकांनी ट्विटरवरुन सिद्धार्थचे अकाउंट सस्पेंड करण्याची मागणीही केली आहे. दुसऱ्या यूजर्सने म्हटले की, हे लोक महिलांच्या बाजूने आवाज उठवतात आणि स्वत: महिलांसाठी असे अपशब्द निवडतात.

सिद्धार्थने साऊथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'रंग दे बसंती' या हिट चित्रपटात सिद्धार्थ दिसला होता. त्याचा 'चश्मे बाहद्दर' हा चित्रपटही चाहत्यांचा चांगलांच पंसतीला उतरला होता. सिद्धार्थ नेहमीच सोशल मीडियावर अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडत असतो, त्याने अनेक मुद्द्यांवरुन भाजपवरही निशाणा साधला आहे.

सिद्धार्थ 'उदारमतवादी' आणि 'पुरोगामी' असल्याचा दावा करतो, परंतु महिलांवर अश्लील लैंगिक टिप्पणी करतो

रंग दे बसंती सारख्या काही हिंदी चित्रपटांमधून दिसलेला अभिनेता सिद्धार्थ सातत्याने भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टीका करत असतो. तो स्वत:हा ‘पुरोगामी’ आणि ‘उदारमतवादी’ असल्याचा दावा करत असतो. सायना नेहवालचे ट्विट पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या सुरक्षा त्रुटींबद्दल होते. मात्र सिद्धार्थला अशा वाईट पद्धतीने प्रतिक्रिया देण्यास आणि भारताच्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेल्या महिलेवर अशी निंदनीय टीप्पणी करण्याची काही एक गरज नव्हती. दरम्यान, सिद्धार्थने PM मोदी आणि सायनाला लक्ष केले. बुल्ली सुल्ली अॅप्समधून ज्या महिलांन लक्ष करण्यात आले त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये सहानुभुती नाही की असा सवालही त्याने उपस्थित केला आहे. आणि याच कारणासाठी तो त्यांच्या राजकीयदृष्ट्या विचाराशी सहमत नसल्याचे दिसत आहे.

काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूवर निशाणा साधल्यानंतर तो चर्चेत आला होता. सामंथाचा नागा चैतन्यपासून घटस्फोट झाल्याची बातमीसंबंधी त्याने हे ट्वीट केले होते.

त्यानंतर ट्विटवरुन केवळ सामंथाच्या चाहत्यांकडूनच नव्हे तर इतर अनेकांनी यूजर्सनी सिध्दार्थवर टीकेची झोड उठवली होती. त्यावर स्पष्टीकरण देत सिध्दार्थने म्हटले होते की, माझे ट्विट सामंथाबद्दल नव्हते तर एक सर्वसामान्य टीप्पणी होती.

सायना नेहवाल ही भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. 31 वर्षीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या परिचयाची गरज नाही. सायनाने तिच्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत 24 आंतरराष्ट्रीय जेतेपदे जिंकली आहेत. तसेच तिने तिच्या कारकिर्दीत खेळलेल्या 640 खेळांपैकी सायनाने 440 जिंकले असून 200 गमावले आहेत.

सायनाची कामगिरी

  • 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक जिंकले होते.

  • 2015 आणि 2017 मध्ये तिने BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.

  • 2010 आणि 2018 मध्ये सायनाने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

  • 2018 मध्ये तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

  • BWF वर्ल्ड टूर 2018 मध्ये, ती तीन स्पर्धांमध्ये उपविजेती होती आणि 2019 मध्ये ती विजेती होती.

  • BWF सुपरसिरीजमध्ये तिने 10 विजेतेपदे जिंकली आहेत (2009 मध्ये एक, 2010 मध्ये तीन, 2012 मध्ये दोन, 2014 मध्ये दोन, 2015 मध्ये एक आणि 2016 मध्ये एक).

  • BWF ग्रँड प्रिक्समध्ये तिने 2006 ते 2017 पर्यंत दहा जेतेपदे जिंकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT