Rajnikanth Viral Video  Dainik Gomantak
मनोरंजन

Rajnikanth Viral Video : जेलर 300 कोटी पार करताच थलैवाने केक कापून आनंद साजरा केला, नव्या चित्रपटाची घोषणाही केली

अभिनेते रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला आहे चित्रपटाने 300 कोटींची कमाई केली आहे.

Rahul sadolikar

Rajnikanth's Jailer : अभिनेता रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा 300 कोटींचा आकडा पार केला आहे.

सनी देओलच्या गदर 2 ने बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केली. तर दुसरीकडे रजनीकांतच्या जेलरने बॉक्स ऑफीसवर धुमाकुळ घातलाय.

आता जेलर यशस्वी झाल्यावर रजनीकांतने सक्सेस पार्टी दिलीय. रजनीकांतने केक कापून आगामी सिनेमाच्या तयारीला लागलाय.

जेलरची तुफान कमाई

10 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या जेलरने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 300 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक विक्रमही मोडले आहेत. चाहत्यांसोबतच रजनीकांतही आपल्या चित्रपटाच्या यशाने खूश आहेत. नुकतंच त्याने हे यश साजरं केलंय.

रजनीकांत यांनी 'जेलर'च्या टीमसोबत केक कापून धूमधडाक्यात सेलिब्रेशन केले. रजनीकांतच्या जेलरने 2023 मधील तमिळ सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. रजनीकांतच्या जेलरने 'पोनियिन सेल्वन 2'लाही मागे टाकले आहे.

ट्विट्टरवर ट्रेंड

'जेलर'च्या यशाचा आनंद साजरा करताना रजनीकांतच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. याशिवाय ट्विटरवर थलैवर 170 ट्रेंड करण्यास सुरुवात केली.

थलैवर 170 हा रजनीकांतचा पुढचा चित्रपट आहे, ज्याची घोषणा नुकतीच रजनीकांतने केली आहे. टीजे ज्ञानवेल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सध्या या चित्रपटाचे नाव फायनल नाही, त्यामुळे सध्या 'थलैवा 170' असे म्हटले जात आहे.

सोशल मिडीयावर थलैवा ट्रोल

त्याचे झाले असे की, रजनी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र रजनी यांनी त्या भेटी दरम्यान योगी यांच्या पाया पडतानाचे फोटोही सोशल मीडियावर आले. त्यावेळी नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले आहे.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

ज्या अभिनेत्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देवाचा दर्जा दिला जातो त्या अभिनेत्यानं योगींच्या पाया पडणे हे काही नेटकऱ्यांना आणि चाहत्यांना आवडलेले नाही.

त्यामुळे रजनी सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होताना दिसत आहे. तुमचे वय काय, योगींचे वय काय, तुम्ही जे काही केले योग्य नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी देत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

Rohit Sharma: टी-20 क्रिकेटमध्ये 'हिटमॅन'ची एन्ट्री, लवकरच मैदानात उतरणार? जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने

VIDEO: अमेरिकेचे थंडरबर्ड्स लढाऊ जेट कॅलिफोर्नियात कोसळले; प्रशिक्षणादरम्यान भीषण अपघात, पायलट थोडक्यात बचावला!

AUS vs ENG: मिचेल स्टार्कचा ऐतिहासिक रेकॉर्ड! वसीम अक्रमला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये ठरला जगातील नंबर-1 डावखुरा वेगवान गोलंदाज VIDEO

IndiGo Flight Bomb Threat: मदीनाहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Indigo Issue: इंडिगोवर 'महा'संकट! 250 हून अधिक उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल; नेमके कारण काय?

SCROLL FOR NEXT