Actor Rajkummar Rao dainik gomantak
मनोरंजन

राजकुमार रावसोबत फसवणूक, पॅनकार्डचा वापर करत घेतले कर्ज

सनी लिओनीनंतर आता चोराचा राजकुमार राववर हात साफ, पॅनकार्डचा वापर करत घेतले 2500 कर्ज

दैनिक गोमन्तक

मुंबई : आपल्याकडे चोर कोणत्याप्रकारे कोणाच्या खिशावर डल्ला मारू शकतात हे सांगता येऊ शकत नाही. आता तर चोर इतके हायटेक झाले आहेत की, तुमच्या मोबाईलचा नंबर, आधार आणि पॅनकार्डचा वापर करून तुम्हाला फसवू शकतात. आता अशाच एका हायटेक चोराचा कारनामा समोर आला असून त्याने चक्क अभिनेता राजकुमार रावला गंडा घातला आहे. याबाबत स्वत: राजकुमार रावने सांगितले असून, याची माहिती त्याने ट्विटरवर दिली आहे. (Actor Rajkummar Rao's PAN Card Used In Loan Fraud)

बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव फसवणुकीचा बळी असून त्याने स्वतः याबाबत सोशल मीडियावर (Social Media) सांगितले की, त्यांच्या पॅनकार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे. त्यांच्या नावावर कर्ज घेण्यात आले आहे. या संदर्भात राजकुमार रावने क्रेडिट इन्फॉर्मेशन लिमिटेडकडे (Credit Information Bureau) तक्रार दाखल केली.

दरम्यान राजकुमार राव (Rajkummar Rao) ने या कर्जामुळे आपल्या CIBIL स्कोअरवरही परिणाम झाल्याचे सांगितले आहे. याआधीही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नावावर फसवणूक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. ज्यात आता राजकुमार रावचेही नाव सामाविष्ट झाले आहे.

तसेच राजकुमार राव याने ट्विटरवर सांगितले की, माझ्या पॅनकार्डचा (PAN Card) वापर करून माझ्या नावावर 2500 रुपयांचे अल्प कर्ज घेतले आहे. या गैरवापरामुळे माझा CIBIL स्कोर खालावला आहे. तर याबाबत तक्रार करताना त्याने पोस्ट केली असून त्यात CIBIL अधिकार्‍याला टॅग केले आहे. तसेच त्याने या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकरणात सावधगिरीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणीही केली आहे.

सनी लिओनीच्या बाबतीतही असेच झाले होते

याच्याआधीही बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीसोबतही (Bollywood Actress Sunny Leone) असाच एक प्रकार घडला होता. तिच्या पॅनकार्डचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्याने 2 हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT