Pankaj Tripathi Dedicate National Awards to late Father : अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचं 21 ऑगस्ट रोजी निधन झालं आणि 24 ऑगस्ट रोजी पंकज त्रिपाठींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एका कलाकाराचं आयुष्य हे कित्येकदा विलक्षण वाटतं ;पण सामान्य माणसांच्या आयुष्यातले ऊन-पावसाचे दिवस एका कलाकाराच्या आयुष्यातही येतात. पंकज त्रिपाठी सध्या एक विलक्षण सु:ख दु:खाच्या भावनेच्या किनाऱ्यावर आहेत.
प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे २१ ऑगस्ट रोजी निधन झाले. तेव्हापासून पंकज त्रिपाठी गोपाळगंजमधील बरौली येथील बेलसांड गावात आपल्या वडिलांचे श्राद्ध विधी करण्यात मग्न आहेत. या दु:खाच्या क्षणी पंकज त्रिपाठी यांना एक आनंदाची बातमी मिळाली.
'मिमी' चित्रपटासाठी या अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 25 ऑगस्ट रोजी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती आणि त्यातच पंकज त्रिपाठी यांच्या नावाचीही या पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती.
वडिलांच्या निधनामुळे पंकज त्रिपाठी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले होते. दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची बातमी समजताच अभिनेता भावूक झाला. 'नवभारत टाइम्स'शी बोलताना ते म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात कधी आनंदाचे तर कधी दुःखाचे वातावरण असते.
त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कुटुंबात अतिशय शोकाकुल वातावरण होते. दु:खाच्या प्रसंगी
सर्वांना वडिलांची आठवण येत होती.
पंकज त्रिपाठी म्हणतात "आता वडिलांच्या आशीर्वादाने 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा श्राद्ध समारंभाच्या मध्यावर करण्यात आली. मला 'मिमी'साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे". अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी हा पुरस्कार त्यांच्या वडिलांना समर्पित केला.
पंकज त्रिपाठी यांच्या कुटुंबात आणि गावातील लोकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या दु:खद प्रसंगातही अश्रू बाजूला सारुन लोक आता आनंद साजरा करत आहेत.
पंकज त्रिपाठी यांचे थोरले बंधू विजेंद्र नाथ तिवारी म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात दु:खानंतर आनंद आणि दु:खानंतर आनंद येतो. वडिलांच्या निधनानंतर लहान भावाला हा मोठा पुरस्कार. हे वडिलांच्या स्मृतीस समर्पित आहे. आज वडील हयात असते तर त्यांनाही या कामगिरीचा आनंद झाला असता.
पंकज त्रिपाठी यांना याआधी 'न्यूटन' चित्रपटासाठी स्पेशल मेन्शन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. नुकताच तो 'OMG 2' या चित्रपटात दिसला, जो बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. पंकज त्रिपाठीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.