The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत असून त्याचे कौतुक ही होताना दिसत आहे. तर या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 1990 मध्ये इस्लामिक अतिरेक्यांनी काश्मिरी पंडितांना स्वतःची जमीन सोडण्यास सांगितले होते. त्यावरती हा चित्रपट आहे. (Actor Nana Patekar's reaction on The Kashmir Files)
तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चित्रपटाचे कौतुक करताना, असे आणखी चित्रपट बनवले पाहिजेत, जेणेकरून सत्य लोकांच्या समोर येईल, असे म्हटले होते. त्यामुळे या चित्रपटाचं कौतुक करणारा एक गट तर दुसरा गट सिनेमावर टीका करणारा तयार झाला आहे. या तयार झालेल्या गटतटावरून अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आपली रोखठोक भुमिका मांडताना, चित्रपटावरून गट पडत असतील तर ते चुकीचं आहे, असं म्हटलं आहे. (Actor Nana Patekar's reaction on The Kashmir Files)
‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटावरून देशात (India) समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन समोर येत आहेत. कर काही राज्यांनी तो टॅक्स फ्री केल्याने इतर राज्यांतही टॅक्स फ्री व्हावा अशी मागणी होत आहे. मात्र महाराष्ट्रासह (Maharashtra) काही राज्यांनी याला विरोध केला आहे. ‘द काश्मिर फाईल्स’वरून समाजमाध्यमांवर (Social Media) होणाऱ्या टीका यावर नाना यांना विचारले असता, मला वाटतं हिंदू (Hindu) आणि मुसलमान (Muslim) हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहाणं गरजेचं आहे. एका चित्रपटावरून असे समाजात गट पडणे हे चुकीचं आहे. तर मी अद्याप हा चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही.
तसेच नाना यांनी, चित्रपटावरून तेढ का? कोण असं करत आहे? त्याला तुम्ही प्रश्न विचारा. आपला समाज गुण्यागोविंदाने नांदत असताना त्यात मिठ टाकू नका, असा सल्ला दिला आहे. तसेच चित्रपट (Cinema) हे पाहण्यासाठी असतात, ते चित्रपट म्हणून पहा. त्यातली वस्तूस्थिती काहींना पटेल असेल काहींना नाही. त्यावरून मत भेद होतील. म्हणून समाजात तेढ निर्माण होणं हे बरोबर नाही, असही नाना म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.