Nagarjuna  Dainik Gomantak
मनोरंजन

अभिनेता नागार्जुनच्या कुटूंबावर शोककळा...बहिणीचे निधन

Rahul sadolikar

Akkineni Nagarjuna's sister passes Away : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेता नागार्जून यांच्या बहिणीचे निधन झाल्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.

नागार्जुन साऊथच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असल्याने ही बातमी हा हा म्हणता पसरली. निधनाचे वृत्त समजताच मनोरंजन विश्वासह अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

नागा सरोज कोण होत्या

मिळालेल्या माहितीनुसार साऊथ सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुन यांची बहीण नागा सरोजा यांचे निधन झाले आहे.

नागा सरोज या बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरोज या दिग्गज अभिनेता अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या कन्या होत्या.

नागार्जुन यांचं कुटूंब

ई सकाळ'च्या वृत्तानुसार गेल्या अनेक दिवसांपासून नागार्जुन यांच्या बहिणीला श्वसनाचा त्रास होत होता. अखेर मंगळवार 17 ऑक्टोबर रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे अक्किनेनी यांच्या घरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. बहिणीच्या मृत्यूनंतर नागार्जुनचे कुटुंब शोकसागरात बुडाले होते.

नागा सरोजा ही अभिनेता नागार्जुनची मोठी बहीण होती. अक्किनेनी नागेश्वर राव यांना पाच मुले होती आणि नागा सरोजा ही तिसरी मुलगी होती. अक्किनेनी नागेश्वर राव यांना सत्यवती, नागा सुशीला, नागा सरोजा, वेंकट आणि नागार्जुन अशा तीन मुली आणि दोन मुलगे होते.

चित्रपटसृष्टीत योगदान

नागार्जुनच्या घरातील तीनही पिढ्या चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. तेलगू चित्रपटसृष्टीत अक्किनेनी कुटुंबाने स्वतःचे वर्चस्व निर्माण केलंय.

नागेश्वर राव यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा धाकटा मुलगा नागार्जुनने पुढे चालू ठेवला आहे. नातू सुमंत, नागा चैतन्य, अखिल आणि सुशांत हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

कुटुंबातील बहुतांश सदस्य चित्रपटसृष्टीत असले तरी नागा सरोज सुरुवातीपासूनच इंडस्ट्रीपासून दूर होत्य. त्या फक्त कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावायच्या.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT