Nagarjuna Akkineni Dainik Gomantak
मनोरंजन

जेव्हा 'शो'मध्ये नागार्जुन, विजय देवराकोंडाला आधीच्या सुनेविषयी विचारतो, समंथाची आठवण अजुनही ...

अभिनेता नागार्जुनने एका शोमध्ये जेव्हा विजय देवराकोंडेला त्याची एकेकाळची लाडकी सून समंथाविषयी विचारलं.

Rahul sadolikar

सध्या बॉक्सऑफिसवर साऊथचा एक चित्रपट धुमाकूळ घालत आहे. बरोबर आम्ही बोलतोय कुशी चित्रपटाबद्दल. या चित्रपटात मुख्य भूमीका साकारणारा साऊथचा सुपरस्टार नागार्जुन सोबत एका शोमध्ये धमाल करताना दिसला.

कुशी चित्रपटात विजयसोबत साऊथची ब्युटी क्वीन समंथाचीही मुख्य भुमीका आहे. समंथा ही नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यची एकेकाळची पत्नी होती ;पण 2021 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण आजही नागार्जुनचं कुटूंब समंथाला विसरलेलं नाही कारण एका शोमध्ये नागार्जुनने समंथाविषयी विजयकडे चौकशी केली.

नागार्जुनने समंथाची चौकशी केली

नागार्जुन अक्किनेनीने विजय देवरकोंडाला कुशी चित्रपटातील त्याची सहकलाकार समंथा रुथ प्रभूची चौकशी केली. शिवाय तिच्यावर कौतुकाचा वर्षावही केला. बिग बॉस तेलुगु 7 या रिअॅलिटी शोच्या भव्य प्रीमियरमध्ये नागार्जुन विजयशी बोलत होता.

विजय त्याच्या अलीकडील चित्रपट कुशीच्या प्रमोशनसाठी शोमध्ये आला होता. कुशी चित्रपटातली मुख्य अभिनेत्रीची भूमीका समंथाने साकारली आहे.अभिनेता नागार्जुन बिग बॉस तेलुगू होस्ट करतो. समंथा ही नागार्जुनची एकेकाळी सून होती.

एपिसोडमधील व्हिडिओमध्ये नागार्जुन विचारताना दिसतो की विजय एकटाच का आला आहे? आणि समंथा कुठे आहे असे विचारले. त्यानंतर विजयने नागार्जुनला सांगितले की समंथा अमेरिकेत आहे कारण तिच्यावर सध्या ट्रीटमेंट सुरू आहे . तो पुढे म्हणाला की समंथा लवकरच भारतातील प्रमोशनल इव्हेंट्स आणि मुलाखतीत सामील होऊ शकेल अशी आशा आहे. 

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, शोमध्ये समंथाचं कौतुक करताना नागार्जुन म्हणाला , “तू एक उत्कृष्ट अभिनेता आहेस. समंथा खूप चांगली अभिनेत्री आहे आणि तुम्ही मिळून एक अप्रतिम जोडी बनवली आहे.” यावेळी विजयने कुशीमधील एका गाण्यावरही परफॉर्म केला.

कुशीचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर लगेचच विजयने सांगितले की, त्याचे समंथावर खूप प्रेम आहे. त्याने सांगितले की जेव्हा तिने एम माया चेसवे पाहिला तेव्हापासून त्याने तिचे कौतुक केले आणि तिचे सर्व चित्रपट पाहिले.

विजयने समंथाचं केलं होतं कौतुक

2022 मध्ये, विजयने सोशल मीडियावर जाऊन तिच्या यशोदा ट्रेलरचे कौतुक केले होते. “तिच्या प्रेमात पडलो होतो, जेव्हा मी तिला पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पाहिले होते. आज मी तिच्या प्रत्येक गोष्टीसाठी कौतुक करतो.

 @Samanthaprabhu2 चा नवीन चित्रपट #YashodaTrailer तुम्हा सर्वांसोबत शेअर करताना खूप आनंद होत आहे. 11-11-2022 थिएटरमध्ये. संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि माझे प्रेम सर्वांसाठी!”

सामंथा रुथ प्रभूने 2021 मध्ये - नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यपासुन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांपैकी कुणीही या टोकाच्या निर्णयाबद्दल किंवा नात्यात काय चूक झाली यावर खुलासा केलेला नाही.

2022 च्या अखेरीस, समंथाला ऑटोइम्यून कंडिशन, मायोसिटिसचे निदान झाले. सिटाडेलच्या इंडियन व्हर्जनसह तिचे प्रलंबित चित्रपट आणि प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर, समंथा सध्या कामातून विश्रांती घेत आहे आणि तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करत आहे. 

Social Media Ban Goa: सोशल मीडिया वापरावर सरसकट बंदी अयोग्य! तवडकरांचे प्रतिपादन; अभ्यासावर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त

"कधी नारद, कधी चार्ली चॅप्लिन, कधी श्रीकृष्ण"! गोव्यातले बापलेक जपताहेत 800 वर्षांची परंपरा; भांड-बहुरूपी कला

Ind Vs NZ: '..मुद्दामून असे केले'! न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर सूर्याचे खळबळजनक वक्तव्य; अय्यरबाबत केले मोठे विधान

Stray Dogs: 'भटक्या कुत्र्यांमुळे पर्यटन घटले'! सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; निर्बीजीकरणच्या अपयशावरती चर्चा

Davorlim Saw Mill Fire: दवर्लीत भीषण आग! सॉ मिल जळून खाक; 50 लाखांच्या नुकसानीचा अंदाज

SCROLL FOR NEXT