Jonathan Majors Arrested Dainik Gomantak
मनोरंजन

Jonathan Majors Arrested :आधी गर्लफ्रेंडवर जीवघेणा हल्ला नंतर गळा दाबला... या अभिनेत्याला पोलिसांकडून अटक...

गर्लफ्रेंडवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी जोनाथन मेजर्स या अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.

Rahul sadolikar

मार्वल चित्रपटांचा स्टार आणि अलीकडेच 'अँट-मॅन अँड द वास्प क्वांटुमॅनिया'मध्ये दिसलेला अभिनेता जोनाथन मेजर्स मोठ्या संकटात सापडला आहे. जोनाथन मेजर्सला शनिवारी मॅनहॅटनमध्ये गळा दाबणे, प्राणघातक हल्ला आणि छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. 

अधिका-यांनी सांगितले की अभिनेत्यावर त्याच्या 30 वर्षीय गर्लफ्रेंडवर प्राणघातक हल्ला आणि गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र जोनाथन मेजर्सने स्वत:ला निर्दोष घोषित करत आपण काहीही केले नसल्याचे म्हटले आहे.

25 मार्च रोजी सकाळी पोलिसांना 911 वर कॉल आला, त्यानंतर पोलिसांना अलर्ट करण्यात आले. त्यानंतर जोनाथन मेजर्सला शनिवारी सकाळी 11:15 च्या सुमारास चेल्सीच्या वेस्ट 22व्या स्ट्रीट आणि 8व्या अव्हेन्यूजवळ अटक करण्यात आली.

 पीडित महिलेने आपल्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले. महिलेच्या डोक्याला व मानेवर किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेला जवळच्या रुग्णालयात नेले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला जोनाथन मेजर्सची गर्लफ्रेंड होती. पीडितेने पोलिसांना सांगितले की ब्रुकलिनमधील बारमधून एकत्र घरी परतत असताना टॅक्सीमध्ये त्यांच्यात वाद झाला. या वादात हाणामारी होऊन महिलेच्या डोक्याला व पाठीवर, कानाच्या मागे व चेहऱ्यावर जखमा झाल्या. 

न्यूयॉर्क शहर पोलिस विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की पीडितेने पोलिसांना कळवले की तिच्यावर हल्ला झाला आहे. अधिकाऱ्यांनी 33 वर्षीय जोनाथन मेजर्सला ताब्यात घेतले. पीडितेच्या डोक्याला आणि मानेला किरकोळ दुखापत झाली असून तिला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कोट्यवधी खर्च केल्यानंतर 'कला अकादमी'ची अवस्था सुधारण्याऐवजी बिघडली कशी काय?

Goa Assembly Live: "हे सरकार मतांचे राजकारण करत नाही"

Loliem: लोलयेवासीय गावाची 'अधोगती' पाहत राहतील की 'विरोध' करण्यास सज्ज होतील?

Kulem: 1967 पासून मूर्ती बनवण्याचे काम, वडिलांना पॅरॅलिसिसचा अटॅक; तरी 3 बहिणींनी जपली 'गणेशमूर्ती' बनवण्याची परंपरा

Damodar Saptah: ..पंढरीच्‍या वारकऱ्यांसाठी जशी विठूमाउली, तसा गोव्यातील भाविकांसाठी दामबाब! आख्‍यायिकांनी भरलेला 'देव दामोदर'

SCROLL FOR NEXT