Fardeen Khan Divorce Dainik Gomantak
मनोरंजन

Fardeen Khan Divorce : संपलेलं ग्लॅमर आणि तुटलेलं घर... लग्नाच्या 18 वर्षांनंतर हा अभिनेता घेणार घटस्फोट?...

अभिनेता फर्दीन खान इंडस्ट्रीपासुन खूपच दूर गेला आहे, त्याच्या करिअरच्या सुरूवातीला असलेलं ग्लॅमर आता नाही, यातच आता त्याच्या घटस्फोटाच्या बातम्याही समोर येत आहेत.

Rahul sadolikar

बॉलीवूडमधील स्टार्सच्या घटस्फोटाच्या बातम्या आता एक सामान्य गोष्ट बनली आहे आणि आता या यादीत अभिनेता फरदीन खानचे नाव देखील जोडले गेले आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर फरदीन खान आणि नताशा माधवानी यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक चालले नाही. चर्चा अशी आहे की हे जोडपे विभक्त होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नताशा मुमताजची मुलगी

नताशा माधवानी ही 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध सुपरहिट नायिका मुमताजची मुलगी आहे. तीच मुमताज, जिने राजेश खन्ना ते धर्मेंद्र यांच्यासोबत तिच्या करिअरमधले बरेच चित्रपट केले आहेत. 1974 मध्ये मुमताजने मयूर माधवानीसोबत लग्न केले. या दोघांना तान्या आणि नताशा या दोन मुली आहेत.

एक वर्षापासुन दोघे वेगळे

'ई-टाइम्स'च्या वृत्तानुसार, फरदीन खान आणि नताशाने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघे वेगळे राहून एक वर्ष झाले. ;पण फरदीन खान आणि नताशा माधवानी यांच्यात मतभेद कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण आता दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आतापर्यंत या वृत्तांवर फरदीन किंवा नताशा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नताशाचा बोलण्यास नकार

याबाबत नताशा आणि फरदीन यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की, या क्षणी मला काहीही बोलायचे नाही. फरदीन खान आणि नताशा यांनी 2005 मध्ये भव्य पद्धतीने लग्न केले होते. दोघांचे लग्न आजही इंडस्ट्रीत लक्षात आहे. या दोघांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्स आणि मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. या दाम्पत्याला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT