Dharmendra on Gadar 2  Dainik Gomantak
मनोरंजन

Dharmendra on Gadar 2 : ईशा, सनी, बॉबी यांना एकत्र पाहुन भावूक झाले धर्मेंद्र, म्हणाले....

अभिनेते धर्मेंद्र आपल्या सर्व मुलांना एकत्र पाहुन भावूक झालेले दिसले.. सोशल मिडीयावर एक नोट शेअर करत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul sadolikar

Gadar 2 : अभिनेते सनी देओल बॉबी देओल ईशा देओल गदर 2 स्क्रिनिंगमध्ये सनी देओलचा चित्रपट गदर 2 बॉक्स ऑफिसवर यश मिळवत आहे. चित्रपटाच्या यशानंतर सनी देओलने बहीण ईशा देओलने कुटुंबासाठी खास स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. यावेळी संपूर्ण देओल कुटुंब चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले . आता गदर 2 च्या या स्क्रिनिंगमधला सनी देओल बॉबी देओल ईशा देओल आणि अहाना देओलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गदरचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

सनी देओलचा चित्रपट गदर 2 थिएटरमध्ये खळबळ माजवत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे तीन दिवस झाले असून या चित्रपटाने 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

 गदरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी, ईशा देओलने कुटुंबासाठी खास स्क्रीनिंग आयोजित केले. यावेळी देओल कुटुंबाचे पुनर्मिलन पाहायला मिळाले. यादरम्यान सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल आणि आहाना देओल एकत्र दिसले.

देओल कुटूंब एकत्र

गदर 2 च्या स्क्रिनिंगमध्ये सनी देओल आणि बॉबी देओल मस्ती करताना दिसले . इशा देओल आणि अहाना देओल या बहिणीही त्याच्यासोबत कार्यक्रमात दिसल्या. भावांसोबत दोघांनीही मीडियासमोर पोज दिल्या. सध्या या स्क्रिनिंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

धर्मेंद्र यांची भावूक पोस्ट

यामध्ये सनी देओल, बॉबी देओल आणि ईशा देओल यांच्या व्हिडिओंची सर्वाधिक चर्चा होत आहे. देओल कुटुंबाच्या या दुर्मिळ व्हिडिओवर धर्मेंद्र यांनीही प्रतिक्रिया दिली. आपल्या मुलांना एकत्र पाहून अभिनेता भावूक झाले आणि एका नोटसह व्हिडिओ शेअर केला.

धर्मेंद्र लिहितात

धर्मेंद्र यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर गदर 2 स्क्रिनिंगमधील सनी, बॉबी, ईशा आणि अहाना देओलचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले, "गदर 2 ला सुपरहिट बनवल्याबद्दल धन्यवाद... एकत्र असणे हा एक मोठा आशीर्वाद आहे."

गदर 2 च्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केले आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 40 कोटींचे खाते उघडले. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 43 कोटी आणि चौथ्या दिवशी 52 कोटींची कमाई केली. गदर 2 ने तीन दिवसांत 135.18 कोटींचा निव्वळ व्यवसाय केला आहे.

काही दिवसांपूर्वी 11 ऑगस्ट रोजी गदर 2 प्रदर्शित झाला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित गदर 2 मध्ये सनी देओलसोबत अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT