Ashish Vidyarthi Marriage Dainik Gomantak
मनोरंजन

Ashish Vidyarthi Marriage : अभी तो हम जवान है, अभिनेता आशिष विद्यार्थी 60 व्या वर्षी चढले बोहल्यावर...

अभिनेते आशिष विद्यार्थी वयाच्या 60 व्या वर्षी विवाहबद्ध झाले आहेत.

Rahul sadolikar

असं म्हणतात लग्न हे एका ठराविक वेळेत करायला हवं, लग्नाचं एक ठराविक वय असतं. अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी वयाच्या ६० व्या वर्षी विवाहबद्ध झाले आहेत . आशिषने आसाममधील रुपाली बरुआसोबत कोर्ट मॅरेज केले.  मिळालेल्या माहितीनुसार आशिष विद्यार्थी यांचं हे दुसरे लग्न आहे. 

बातमीनुसार, या लग्नात फक्त आशिष विद्यार्थीचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र सामील झाले होते. रिपोर्ट्सनुसार, अभिनेता लवकरच रिसेप्शन पार्टी आयोजित करेल आणि त्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी इतर नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित करेल.

नववधू रुपाली बरुआ कोण आहे?

आशिष विद्यार्थ्याने कोलकाता येथे रुपाली बरुआशी लग्न केले. एकीकडे आशिष विद्यार्थी यांची बॉलिवूडमध्ये एक खास ओळख आहे, तर त्यांची वधू रुपाली बरुआ ही आसाममधील फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहे.

 रुपाली गुवाहाटी येथील रहिवासी असून तिचे फॅशन स्टोअर कोलकाता येथे आहे. थोडक्यात अभिनेता आणि फॅशन डिझायनर ही जोडी योग्यच जमली असंच म्हणावं लागेल.

आशिष विद्यार्थी म्हणतात

लग्नानंतर आशिष विद्यार्थी मीडियाशी बोलताना म्हणाले- 'आयुष्याच्या या टप्प्यावर लग्न करणे ही एक असामान्य भावना आहे. आम्ही सकाळी कोर्ट मॅरेज केले आहे आणि संध्याकाळी गेट-टूगेदर करू. 

आपल्या प्रेमकथेबद्दल बोलताना आशिष म्हणाला की, ही एक लांबलचक कथा आहे, त्याबद्दल पुन्हा बोलू. लग्नाबाबत नववधू रुपाली (रुपाली बरुआ) म्हणाली- 'आम्ही काही काळापूर्वी भेटलो होतो आणि नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला'. 

आशिष विद्यार्थी यांचे करिअर

आशिष विद्यार्थी बद्दल बोलायचे तर त्याने 11 भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी व्यतिरिक्त, या भाषांमध्ये तामिळ, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजीचा समावेश आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, 'बिच्छू', 'जिद्दी', 'अर्जुन पंडित', 'वास्तव', 'बादल' अशा अनेक चित्रपटांमध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Celebration: "ट्रम्प यांच्या पतनाची सुरुवात झाली!", मध्यावधी निवडणुकीच्या निकालानंतर इराणमध्ये जल्लोष; हजारो लोक उतरले रस्त्यावर VIDEO

Viral Video: तुम्हाला दिवाळीत काय मिळालं? सोनपापडी की ड्रायफ्रूट्स? 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना थेट iPhone 16 गिफ्ट केला! नेटकरी म्हणाले, 'व्हॅकन्सी आहे का?'

America Sanctions 2026: निवडणुकीतील पराभवाचा राग भारतावर? ट्रम्पकडून भारतीय दाम्पत्यासह 9 कंपन्यांवर कठोर निर्बंध; इराणला मदत केल्याचा आरोप

Private Bus Safety: बसची क्षमता 48, पण प्रवासी तब्बल 140! म्हापशात कामगारांच्या जिवाशी खेळ; खासगी बस ताब्यात

Goa Politics: बोरकरांची खोलकरांना नोटीस; 3 दिवसांत माफी मागा, अन्यथा 6 कोटींचा मानहानी खटला!

SCROLL FOR NEXT