Abhishek Bachchan Dainik Gomantak
मनोरंजन

Abhishek Bachchan: ऐश्वर्याशी लग्न करण्यापूर्वी 'या' अभिनेत्री होत्या अभिषेक बच्चनच्या प्रेमात

Abhishek Bachchan Love Life: अभिषेक बच्चनचे सुरुवातीच्या काळात अनेक अभिनेत्रीसह अफेअर होते.

दैनिक गोमन्तक

रेफ्युजी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या अभिषेक बच्चनला चित्रपटसृष्टीतील मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासारखे यश मिळाले नाही. पण तरीही तो चित्रपट कॉरिडॉरमध्ये खूप प्रसिद्ध आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच अभिषेक अनेकदा त्याच्या साधेपणामुळे तर कधी त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहिला. ऐश्वर्या राय बच्चनसोबत लग्न करण्यापूर्वी अभिषेक बच्चनचे (Abhishek Bachchan) नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. या अभिनेत्री कोणत्या आहेत हे पाहुया. (Abhishek Bachchan Love Life News)

* राणी मुखर्जी

अभिषेक बच्चनने 'बंटी और बबली', 'युवा' आणि 'कभी अलविदा ना कहना' यांसारख्या चित्रपटांमध्ये (Movie) राणी मुखर्जीसह एकत्र काम केले. शूटिंगच्या दिवसांमध्ये त्यांच्यात खूप जवळीक वाढू लागली आणि त्यांच्या अफेअरच्या बातम्या फिल्मी कॉरिडॉरमध्ये सामान्य झाल्या. पण दोघांनीही आपले नाते लोकांसमोर मान्य केले नाही. त्यानंतर दोघेही वेगळे झाले. राणी मुखर्जीने चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्न केले आहे.

* दीपनीता शर्मा

अभिषेक बच्चनचे नाव दीपनीता शर्मासोबतही जोडले गेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. स्वत: अभिषेकने मात्र याबाबत कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

* करिश्मा कपूर

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांची पहिली भेट एका लग्नात झाली होती. यानंतर दोघेही मित्र झाले आणि एकमेकांना डेट करू लागले. दोघांनीही एंगेजमेंट केल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले, पण हे नातं फार काळ टिकू शकले नाही आणि अवघ्या पाच महिन्यांतच त्यांचे लग्न तुटले.

* ऐश्वर्या राय बच्चन

'उमराव जान' चित्रपटाच्या सेटवर अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायच्या (Aishwarya Rai) प्रेमात पडला. त्यानंतर 'गुरू' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केले. 2007 मध्ये दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT